मुख्य मजकुरावर जा
Sunday, 6 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 05 September 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

सोमेश्वर च्या निवडणुकीचे बिगुल वाजले २१ जागांसाठी ७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार; ११ ऑक्टोबरला मतदान

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
September 5, 2026 1 मिनिट वाचन 3,513 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

संपादक मधुकर बनसोडे

बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि., सोमेश्वरनगरच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, पुणे विभाग यांच्या कार्यालयाकडून निवडणुकीचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार एकूण २१ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये उत्पादक सभासद प्रतिनिधींच्या १५ जागा, ‘ब’ वर्ग सहकारी उत्पादक/बिगर उत्पादक संस्था व पणन संस्थेची १ जागा, अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी १ जागा, महिला राखीव प्रतिनिधी २ जागा, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी १ जागा तसेच भटक्या विमुक्त जाती-जमाती/विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधीची १ जागा यांचा समावेश आहे.
निवडणूक कार्यक्रमातील महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे :
७ सप्टेंबर २०२६ – निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध.
७ ते ११ सप्टेंबर २०२६ – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत. वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत.
१५ सप्टेंबर २०२६ – उमेदवारी अर्जांची छाननी; सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात.
१६ सप्टेंबर २०२६ – वैध उमेदवारी अर्जांची यादी प्रसिद्ध.
१६ ते ३० सप्टेंबर २०२६ – उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत; ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत.
२ ऑक्टोबर २०२६ – निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी व चिन्हांचे वाटप; सकाळी ११ वाजता.
११ ऑक्टोबर २०२६ – मतदान, सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत.
१२ ऑक्टोबर २०२६ – मतदान संपल्यानंतर मतमोजणी करण्यात येणार आहे.
निवडणूक कार्यक्रमाच्या पत्रकात महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम तसेच राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, अंतिम मतदार यादी २१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याने सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीला प्रत्यक्षात रंगत येणार आहे. विविध गटांमध्ये उमेदवारांची मोर्चेबांधणी आणि राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख