मुख्य मजकुरावर जा
Sunday, 6 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 06 September 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

चौधरवाडीला सोमेश्वर कारखान्याच्या संचालकपदाची संधी द्यावी; ग्रामस्थांची सुनेत्रा वहिनी पवार यांच्याकडे मागणी

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
September 6, 2026 1 मिनिट वाचन 3,520 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

 प्रतिनिधी

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याच्या पार्श्वभूमी श्री सोमेश्वराचे दर्शन घेऊन शेतकरी मेळाव्याला जात असताना महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्रा वहिनी पवार पुण्याहून येत असताना चौधरवाडी गावात थांबल्या. त्यावेळी समस्त चौधरवाडी ग्रामस्थांच्या वतीने श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदासाठी चौधरवाडी गावाला प्रतिनिधित्वाची संधी द्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.

या मागणीसाठी श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री. सुखदेव पोपट शिंदे यांच्या नावाचा उमेदवारीसाठी विचार करावा, असे निवेदन सौ. सुनेत्रा वहिनी पवार यांना ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले.

यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की, चौधरवाडी गावाने अनेक वर्षांपासून सामाजिक, सहकार आणि शेतकरी हिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यामुळे श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळात चौधरवाडी गावाला प्रतिनिधित्वाची संधी मिळावी, ही ग्रामस्थांची अनेक वर्षांची अपेक्षा आहे.

श्री. सुखदेव शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून, श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप, अन्नदान, आरोग्यविषयक उपक्रम, वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना मदत तसेच विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत चौधरवाडी ग्रामस्थांनी त्यांच्या नावाचा संचालकपदासाठी विचार करण्याची मागणी केली.

ग्रामस्थांनी आपली भूमिका मांडल्यानंतर सौ. सुनेत्रा वहिनी पवार यांनी ग्रामस्थांचे म्हणणे सकारात्मकपणे ऐकून घेत “चौधरवाडीला संधी देण्याबाबत नक्कीच विचार करू,” असा शब्द दिला. त्यामुळे चौधरवाडी ग्रामस्थांमध्ये आशावादी वातावरण निर्माण झाले असून, गावाला यावेळी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाची संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

“चौधरवाडीला यावेळी प्रतिनिधित्व मिळावे, ही समस्त ग्रामस्थांची भावना असून, गावाच्या विकासासाठी आणि शेतकरी हितासाठी ही संधी महत्त्वाची ठरणार आहे,” अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख