मुख्य मजकुरावर जा
Sunday, 6 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 06 September 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

माळेगाव पोलिसांची धडक कारवाई; सार्वजनिक ठिकाणी लोखंडी कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या इसमास अटक

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
September 6, 2026 1 मिनिट वाचन 3,502 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी.

माळेगाव, दि. ०६ सप्टेंबर २०२६ :
माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण करून हातात लोखंडी कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या इसमावर माळेगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करून त्याच्याकडून लोखंडी कोयता जप्त केला आहे.

दि. ०६/०९/२०२६ रोजी सायंकाळी सुमारे १८.०० वा. माळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना, माळेगाव पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे मेढड गावातील रखुमाई मंदिरासमोरील रोडवर एक इसम हातात लोखंडी कोयता घेऊन दहशत निर्माण करीत आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी तात्काळ जाऊन पाहणी केली असता, मिळालेल्या वर्णनाप्रमाणे एक इसम नामे तन्मय बापूराव गुळीक वय २५ वर्षे रा. मेडद ता. बारामती हातात लोखंडी कोयता घेऊन संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील लोखंडी कोयता जप्त केला.

सदर इसमाविरुद्ध शस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम ४ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७(१)(अ)(३) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा. संदीपसिंह गिल सो पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. गणेश बिरादार अपर पोलीस अधीक्षक सो बारामती विभाग, मा. चैतन्य कदम सो उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ , पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, पोलीस अंमलदार विजय वाघमोडे, अमर थोरात, ज्ञानेश्वर मोरे, अमोल वाघमारे, अमोल राऊत यांनी केली.

माळेगाव पोलिसांचे आवाहन

सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या व्यक्तींविरुद्ध माळेगाव पोलीस स्टेशनकडून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, नागरिकांनी अशा प्रकारची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी.

— माळेगाव पोलीस स्टेशन
जि. पुणे ग्रामीण

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख