आमराई भागात बारामती शहर पोलिसांची मोठी कोम्बिंग मोहीम
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
माळेगावातील खुनाच्या प्रयत्नातील आरोपींचा शोध; रेकॉर्डवरील व्यक्तींची पडताळणी, शस्त्रे व संशयित वाहनांवर विशेष नजर
बारामती : माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोपींचा शोध घेण्यासाठी तसेच बारामती शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रतिबंधात्मक नियंत्रण ठेवण्यासाठी आमराई परिसरात बारामती शहर पोलिसांकडून मोठी कोम्बिंग मोहीम राबविण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
माळेगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. २६१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १०९, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० तसेच शस्त्र अधिनियम, १९५९ मधील कलम ४ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास माळेगाव बु. येथील तावरे पेट्रोल पंप परिसरात पूर्वीच्या वादातून धारदार कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेत संदीप दत्तात्रय जगताप, अनिकेत उदयसिंह धुमाळ आणि पृथ्वीराज अतुल निंबाळकर हे जखमी झाले आहेत. या प्रकरणात गणेश भोसले, शुभम मोरे, मयूर रामचंद्र शितोळे, प्रेम कांबळे, हर्षद रणधीर, भुमेश झेंडे यांच्यासह इतर व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणातील प्रेम कांबळे, शुभम मोरे आणि गणेश भोसले यांचा शोध घेण्यासाठी आमराई परिसरातील संभाव्य वास्तव्याची ठिकाणे, संपर्कस्थळे तसेच संशयित हालचालींची पोलिसांनी तपासणी केली. त्याचबरोबर गंभीर व शरीरविषयक गुन्ह्यांच्या नोंदी असलेल्या व्यक्तींच्या वास्तव्याची आणि हालचालींचीही कायदेशीर पद्धतीने पडताळणी करण्यात आली.
कोम्बिंग मोहिमेत परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा ओमासे, पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत इंगवले, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव यांच्यासह तपास पथकातील अधिकारी-कर्मचारी आणि बारामती शहर पोलीस ठाण्यातील पुरुष व महिला पोलीस कर्मचारी सहभागी झाले. एकूण सहा अधिकारी आणि सुमारे ५० पोलीस अंमलदारांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
दरम्यान, बारामती शहर पोलीस ठाण्याच्या अभिलेखातील विविध गुन्ह्यांशी संबंधित व्यक्तींच्या वास्तव्याची व हालचालींचीही पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. या पडताळणीमध्ये हर्षद राजू काकडे बागवान, धनाजी/धनंजय आत्माराम पाथरकर, धीरज रविंद्र पडकर, निहाल उर्फ रावण विजय दामोदरे, गणेश तुळशीराम पवार, अमर आत्माराम पाथरकर, आदेश संजय कुचेकर, सुनिल संभाजी माने, रोहित केशव जगताप, लाला आत्माराम पाथरकर, सचिन आत्माराम पाथरकर, वैभव उर्फ गुडड्या बाबू बगाडे, निलेश प्रदीप उमरदंड, यश उर्फ मंगेश सुभाष मदने, धिरज दशरथ थोरात, विठ्ठल उर्फ छोट्या यल्लाप्पा पवार, यश दीपक मोहिते, अक्षय उर्फ आकाश उर्फ भो-या बापूराव जाधव, बालाजी उर्फ बाल्या अनिल माने, अमिन दिलावर इनामदार आणि नितीन बाळासाहेब तांबे यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
कोम्बिंग मोहिमेदरम्यान अग्निशस्त्रे, कोयते, तलवारी अथवा इतर बेकायदेशीर हत्यारे बाळगली किंवा साठवली आहेत का, फरार आरोपींना आश्रय दिला जात आहे का तसेच गुन्हेगारी कृत्यांसाठी वापरली जाणारी साधनसामग्री उपलब्ध आहे का, याचीही कायदेशीर चौकटीत तपासणी करण्यात आली.
याशिवाय आमराई परिसरात नंबरप्लेट नसलेली, संशयास्पदरीत्या उभी असलेली तसेच वाहनचोरीच्या अनुषंगाने पडताळणी आवश्यक असलेली वाहने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आली. या वाहनांची कागदपत्रे, इंजिन क्रमांक, चेसिस क्रमांक आणि पोलीस अभिलेख तपासण्याचे काम सुरू असून, चोरीचे वाहन आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल आणि अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
बारामती शहर पोलिसांनी गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपींचा शोध, बेकायदेशीर शस्त्रांवर नियंत्रण, संशयित वाहनांची तपासणी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद हालचाली किंवा व्यक्तींबाबत पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
“गुन्हेगारीला जागा नाही, कायद्याला पर्याय नाही.”
