मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Tuesday, 29 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 29 September 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

माळेगावात कोयत्याने जीवघेणा हल्ला; तिघे जखमी, तावरे पेट्रोल पंप परिसरातील घटना; १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
September 29, 2026 1 मिनिट वाचन 3,506 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी : अक्षय थोरात

माळेगाव बु. (ता. बारामती) येथील तावरे पेट्रोल पंप परिसरात जुन्या वादाच्या कारणातून तिघांवर धारदार लोखंडी कोयत्याने हल्ला केल्याची घटना २८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत संदीप दत्तात्रय जगताप (वय ४६), अनिकेत उदयसिंह धुमाळ (वय २७) आणि पृथ्वीराज अतुल निंबाळकर (वय २९) हे तिघे जखमी झाले आहेत.

 

या प्रकरणी संदीप जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २६१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. गणेश भोसले, शुभम मोरे, मयूर रामचंद्र शितोळे, प्रेम कांबळे, हर्षद रणधीर, भुमेश झेंडे तसेच इतर ६ ते ७ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ तसेच शस्त्र अधिनियम, १९५९ मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस नोंदीनुसार, संदीप जगताप हे आपल्या मित्रांसह तावरे पेट्रोल पंप परिसरात गप्पा मारत असताना अनिकेत धुमाळ यांनी यापूर्वी झालेल्या वादात मध्यस्थी करून भांडण सोडविल्याच्या कारणावरून आरोपींनी धारदार लोखंडी कोयते घेऊन त्यांच्यावर हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यावेळी संबंधितांनी जीवे मारण्याची धमकी देत कोयत्याने तसेच हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेदरम्यान परिसरात नागरिक जमा झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित व्यक्ती मोटारसायकलीवरून घटनास्थळावरून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १०९, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० तसेच शस्त्र अधिनियम, १९५९ मधील कलम ४ व २५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

गुन्ह्याची नोंद २९ सप्टेंबर रोजी पहाटे २.३८ वाजता झाल्याची पोलिस नोंद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक साळवे करीत आहेत.

टीप : वरील प्रकरणातील हल्ला, धमकी व इतर आरोप हे फिर्यादीत नमूद केलेले आरोप असून, त्यांची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेत निश्चित होणे बाकी आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख