मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Tuesday, 29 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 29 September 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

शेरेवाडी-बापुर्डी परिसरात दुहेरी हत्याकांड

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
September 29, 2026 1 मिनिट वाचन 3,501 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

कृष्णाबाई लडकत व इंदुबाई लडकत यांचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून; परिसरात खळबळ

 

बारामती/सुपा : बारामती तालुक्यातील शेरेवाडी-बापुर्डी परिसरात दोन महिलांची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कृष्णाबाई लडकत आणि इंदुबाई लडकत अशी मृत महिलांची नावे असल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेरेवाडी-बापुर्डी परिसरातील एका ठिकाणी दोन्ही महिलांचे मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर सुपा पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

 

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला असून, हत्येमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. दोन्ही महिलांची हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, तसेच या हत्याकांडामागे कोणाचा हात आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

 

घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे मिळविण्यासाठी ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकाची मदत घेण्यात येत आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके कार्यरत करण्यात आल्याची माहिती आहे.

 

दरम्यान, एकाच वेळी दोन महिलांची हत्या झाल्याने शेरेवाडी-बापुर्डी परिसरासह बारामती तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सुपा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख