मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Wednesday, 30 September 2026

M NEWS MARATHI
मराठी डिजिटल न्यूज
माझा जिल्हा

मालेगाव बु. नगरपंचायतीच्या स्वच्छता व्यवस्थेला बळकटी ; ३००० लिटर क्षमतेची अत्याधुनिक सक्शन-कम-जेटिंग मशीन दाखल

mnewsmarathi 30 Sep 2026 1 मिनिट वाचन 4,930 वाचन

सहसंपादक अक्षय थोरात

केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या  स्वच्छ महाराष्ट्र मिशन अभियानांतर्गत मालेगाव बु. नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागासाठी मोठी उपलब्धी प्राप्त झाली आहे. नगरपंचायतीला ३००० लिटर क्षमतेची अत्याधुनिक सक्शन-कम-जेटिंग मशीन प्राप्त झाली असून, या वाहनाचे दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी विधिवत पूजन करण्यात आले.

 

या पूजन कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक जयदीप पाटील, नगरपंचायतीचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

मशीनचा उपयोग काय होणार?

 

सदर मशीनच्या माध्यमातून नगरपंचायत क्षेत्रातील अनेक प्रलंबित स्वच्छतेची कामे अधिक वेगाने आणि कार्यक्षमतेने होणार आहेत.

 

  • – सेप्टिक टँकची साफसफाई
  • – गटारे, नाले व ड्रेनेज लाईनची साफसफाई
  • – सीवर लाईनमधील चोकअप दूर करणे
  • – पावसाळी नाल्यांमधील गाळ व अडथळे काढणे
  • – सांडपाणी व द्रव गाळ सक्शनद्वारे उचलणे

 

मशीनमध्ये उपलब्ध असलेल्या सक्शन व उच्चदाब जेटिंग प्रणालीमुळे बंद झालेल्या पाइपलाइन व ड्रेनेज लाईन स्वच्छ करणे तसेच सांडपाणी व्यवस्थापनाची कामे जलद व प्रभावीपणे करता येणार आहेत.

 

त्यामुळे नगरपंचायत क्षेत्रातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक गती व कार्यक्षमता प्राप्त होणार असून, नागरिकांना तत्पर स्वच्छता सेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.

 

या नव्या यंत्रणेमुळे सफाई कामगारांना मानवी हस्तक्षेपाशिवाय सुरक्षित पद्धतीने काम करता येणार असून, मालेगाव बु. अधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi