प्रतिनिधी
कोळगाव ता निफाड येथील विंचूर ते कोळगाव रस्ता हा शिर्डी कडे जाणारा मधला व सुखरूप मार्ग म्हणून ओळखला जातो हा रस्ता झाल्याने शिर्डी कडे जाणारे भाविक व गुजरात कडील पाई जाणाऱ्या दिंड्या ह्या मार्गाने जात आहे हा रस्ता पि डब्लु डी कडे वर्ग आहे हृया रस्त्यालगत प्रत्येक वळणावर व सगळ्या शाळा या ठिकाणी फलक लावण्यात आले परंतु कोळगाव माळचारी येथील जिल्हा परिषद वस्ती शाळा यांची जणू दप्तरी नोंद झालीच नाही असे दिसते येथे कोणत्याही प्रकारचा फलक नाही व लावण्यात ही आला नाही सदर शाळेच्या आवारात सध्या बालवाडी देखील सुरू आहे ह्या लहान मुलांचा प्रश्न ऐरणीवर आलाय शाळा सुटल्यावर हे विद्यार्थी अचानक रस्त्यावर येऊन काही अनुचित प्रकार घडू नये कारण फलक नसल्याने वाहन चालकांना येथे शाळा आहे हे समजणार कसे तरी प्रशासनाने आपलीं तत्परता दाखवली पाहिजे व होणाऱ्या संभाव्य परिणामाला ओळखून फलक लावावा अशी मागणी पालक आणि रहीवाशी करत आहेत
