मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Tuesday, 13 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

मॉडिफाइड सायलेन्सरद्वारे फटाक्यांसारखा आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई; तीन बुलेटवर ₹१८ हजारांचा दंड!

mnewsmarathi 13 Oct 2026 1 मिनिट वाचन 3,613 वाचन

प्रतिनिधी

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुलेट मोटारसायकलींना मॉडिफाइड सायलेन्सर बसवून फटाक्यांसारखा मोठा आवाज करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलिसांनी कारवाई केली आहे.

मॉडिफाइड सायलेन्सरमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या प्रकारांना आळा घालण्यासाठी वडगाव निंबाळकर पोलिसांनी विशेष कारवाई करत तीन बुलेट मोटारसायकली पकडून संबंधित वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत एकूण १८,००० रुपये दंड आकारण्यात आला. तसेच संबंधित बुलेट मोटारसायकलींचे मॉडिफाइड सायलेन्सर काढून टाकण्यात आले.

सदर कारवाई API मोहिते साहेब व PSI मुलाणी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमध्ये पोलीस हवालदार खेडकर, पोलीस हवालदार खांडेकर, पोलीस अंमलदार पन्हाळे तसेच पोलीस कॉन्स्टेबल यादव, जाधव, धोत्रे, येताळे व पवार यांनी सहभाग घेतला.

नागरिकांना आवाहन :

वाहनांमध्ये अनधिकृत बदल करून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसवू नयेत. ध्वनीप्रदूषण करून नागरिकांना त्रास होईल असे कृत्य करू नये. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन

पुणे ग्रामीण पोलीस

लेखक

mnewsmarathi

M News Marathi