मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Saturday, 10 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बारामती जिल्हा आयोजित शक्ती गर्जना युवती संमेलन ९ ऑक्टोबर २०२६ रोजी जिवराज सभागृह तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती येथे संपन्न झाला. 

mnewsmarathi 10 Oct 2026 1 मिनिट वाचन 4,007 वाचन

प्रतिनिधी

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बारामती जिल्हा आयोजित शक्ती गर्जना युवती संमेलन ९ ऑक्टोबर २०२६ रोजी जिवराज सभागृह तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती येथे संपन्न झाला.

उद्घाटन प्रसंगी डॉ. किर्ती पवार, अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री श्रावणी बाचल, कार्यक्रम प्रमुख स्नेहा दिकेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

समाजात आपल्या कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या विशेष महिलांचा नवदुर्गा सन्मान करण्यात आला. ज्यामध्ये डॉ. अंजली खाडे, डॉ.सुप्रिया बोबडे, ऍडव्होकेट रेश्मा अडलिंगे, सौ. रामेश्वरी जाधव, ऍडव्होकेट. स्नेहल नाईक, डॉ. किर्ती पवार यांचे सन्मान करण्यात आले.

भाषण सत्रामध्ये सौ. स्मृती इंगळे यांनी महिला व संस्कृती या विषयाची मांडणी केली. तसेच मुलाखत सत्र देखील घेण्यात आले ज्यामध्ये डॉ. किर्ती पवार यांची मुलाखत घेण्यात आली, व सौ. स्वाती कुलकर्णी यांनी मुलाखत घेतली.

संमेलन मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले ज्यामध्ये युवतींनी तलवारबाजी, दांडपट्टा, लाठी काठी, नृत्याविष्कार सादर केला.

बारामती मधील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi