सोमेश्वर चे चेअरमन संचालक मंडळ थोडे शेतकी विभागावरती लक्ष द्याल का?

माझा जिल्हा

संपादक मधुकर बनसोडे.

सोमेश्वरच्या उत्पादक शेतकऱ्याची चेअरमन व संचालक मंडळ यांना भावनिक हक्क. ऊस उत्पादकाच्या ऊस बिलातून भरगच्च पगार घेणारे काही अधिकारी कर्मचारी पंख्याखालच्या खुर्चीतून उठून थोडे शेताच्या बांधावरती जाण्याचे आदेश द्याल का?

कारखाना सुरू झाला काही उसाला तोडी आल्या ऊस तोड मजूर कमी असल्याचे वारंवार सांगून शेतकऱ्याची मानसिक खच्चीकरण केले आणि याचाच फायदा ऊस तोड मजुरांनी घेतला? उसाला तोड आल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात उसाच्या कांड्या राहत आहेत मात्र याकडे पाहण्यासाठी किंवा ऊसतोड मजुरांना सूचना देण्यासाठी शेतकी खात्यातील ओव्हर शिअर खुर्चीतून बाहेर गेलेले दिसत नाहीत? काही ओव्हर शिअर फक्त मोठ्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ऊस तोड कशी होत आहे याची पाहणी करतात एक एकर शेतजमीन असणाऱ्या ऊस उत्पादकाने तक्रार केली तरीही शेतकी खात्याचे ओव्हर शिअर टाळी मारून, हसून विषय मारून नेतात अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत आहे!अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांवरील पकड ही कमजोर होत चाललेली आहे का अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांवरील पकड ( वचक, दबदबा ) जर कमी होत असेल तर अशा संस्था भविष्यात तोट्यात जातात असे म्हटले जाते

शेतकी विभागाकडे एखादा शेतकरी तक्रार घेऊन गेल्यास नेहमीच टाळाटाळीची उत्तरे दिली जातात.

आम्हाला संचालकाने कामाला लावले आहे आमचं कोणीही काहीही करू शकत नाही आमचा संचालक स्ट्रॉंग आहे. अशा भावना सोमेश्वर कारखान्यातील काही कर्मचाऱ्यांच्या झालेल्या आहेत? शेतकी विभागात गेलेल्या अनेक कर्मचाऱ्यांकडून वयोवृद्ध ऊस उत्पादक शेतकऱ्याला दर्जाहीन पद्धतीची वागणूक दिली जाते. दक्षिणेच्या नावाखाली ऊस तोडीसाठी सर्रास शेतकऱ्यांकडून पैसे उकळले जातात? या उकळलेल्या पैशांमध्ये शेतकी विभागातील कोणाचा वाटा असतो का? याची शहानिशा कारखाना प्रशासनाने केली पाहिजे अगोदरच अतिवृष्टीने उसाचे पीक हे खराब झाल्यामुळे चालू सीजन ला उसाला एव्हरेज बसत नाही त्यातच जर कारखान्यातील काही कर्मचारी अधिकारी यांच्याकडून शेतकऱ्याचे असे नुकसान होणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागेल?

इतर गटांपेक्षा गट नंबर एक मधील ऊसतोड उशिरा होत आहे असे देखील शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे मात्र आम्ही ज्यांना निवडून दिलं त्यांना आमच्या अडचणी कडे पाहणीसाठी वेळच नाही आशा देखील भावना ऊस उत्पादक व्यक्त करीत आहे. काही शेतकरी लवकरच राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांना भेटून यासंदर्भात निवेदन देणार असल्याचेही बोलले जात आहे.