मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Wednesday, 4 November 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
ताज्या बातम्या

मु.सा काकडे महाविद्यालया च्या यश नाळे ची मैदानी स्पर्धेत चमकदार कामगिरी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

mnewsmarathi 04 Nov 2026 1 मिनिट वाचन 3,851 वाचन

प्रतिनिधी.
सोमेश्वरनगर ,येथील मु.सा काकडे महाविद्यालयातील यश दादासो नाळे (११वी विज्ञान) पिंपरी चिंचवड येथील क्रीडा संकुल मध्ये संपन्न झालेल्या विभागीय १००मीटर धावणे स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात सुवर्णपदक प्राप्त करून राज्यस्तरीय १००मीटर धावणे स्पर्धेसाठी निवड झाली. या यशाबद्दल यशचे संस्थेचे अध्यक्ष सतीश भैय्या काकडे- देशमुख व विकास समितीचे अध्यक्ष तथा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत भैय्या काकडे-देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव सतीश लकडे सर यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याला प्रा डॉ. बाळासाहेब मरगजे व प्रा. दत्तराज जगताप यांनी मार्गदर्शन केले.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi