मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Monday, 2 November 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

रेशन कार्डधारकांना मोठा धक्का ! ५३ हजार लाभार्थ्यांचे धान्य बंद, नवीन नियम लागू

mnewsmarathi 02 Nov 2026 1 मिनिट वाचन 3,629 वाचन

प्रतिनिधी

राशनतकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता रेशन दुकानातून मोफत किंवा सवलतीच्या दरात धान्य मिळवण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या नव्या निकषांमुळे सोलापूर शहरातले तब्बल ५३ हजार लाभार्थ्यांचे रेशनधान्य बंद करण्यात आलंय.

त्यामुळे तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे, तुमच्याकडे चारचाकी वाहन आहे का आणि तुम्ही नियमित रेशन घेता का, या गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

 

केंद्र सरकारच्या ‘मिशन सुधार’ उपक्रमांतर्गत रेशनकार्डधारकांच्या पात्रतेची तपासणी केली जातेय. यामध्ये अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून संबंधित जिल्ह्यांना पाठवण्यात आली आहे.

 

नव्या निकषांनुसार शहरी भागातल्या रेशनकार्डधारकांचं वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपयांपंर्यंत असणं आवश्यक आहे. म्हणजेच दररोज १६२ रुपये उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांनाच पात्रतेच्या निकषात बसता येणार आहे. तर ग्रामीण भागातल्या लाभार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ४४ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच दररोज १२१ रुपये उत्पन्न असणं अपेक्षित आहे. यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांचे रेशनधान्य बंद केले जाणार आहे.

कोणत्या लाभार्थ्यांचे रेशनधान्य बंद होणार?

 

1. उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेले लाभार्थी

 

2. प्राप्तिकर भरणारे रेशनकार्डधारक

 

3. चारचाकी वाहन असलेले लाभार्थी

 

4. बनावट किंवा दुबार रेशनकार्डधारक

 

5. सलग तीन ते सहा महिने रेशनधान्य न घेणारे लाभार्थी

 

या निकषांनुसार सोलापूर शहरातले ५३ हजार लाभार्थ्यांचं धान्य बंद करण्यात आलं आहे. तसेच जवळपास १ लाख लाभार्थ्यांनी अजून ई-केवायसी पूर्ण केलेली नसल्याची माहिती समोर आली आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi