मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Monday, 2 November 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली शस्त्रसाठा; चार कोयते आणि तलवार जप्त,

mnewsmarathi 02 Nov 2026 1 मिनिट वाचन 3,671 वाचन

प्रतिनिधी

 

कुस्तीच्या तालमीतील लाल मातीखाली लपवून ठेवलेले चार धारदार कोयते आणि एक तलवार असा घातक शस्त्रसाठा बारामती शहर पोलिसांनी उघडकीस आणला.पूर्ववैमनस्यातून हल्ल्याची तयारी सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

 

याप्रकरणी योगेश उर्फ धन्या गोकुळ कांबळे, आदेश संजय कुचेकर, ऋषिकेश उर्फ पप्पू अनिल चंदनशिवे आणि अभिजीत प्रदीप शिंदे या चौघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना ६ नोव्हेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.बारामती शहरातील कसबा परिसरातील जामदार रोडवरील गणेश मंदिराशेजारी असलेल्या कुस्तीच्या तालमीत शस्त्रे लपविल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य वसंतराव कदम यांना ३१ ऑक्टोबर रोजी मिळाली.

 

त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शोधमोहीम राबवून शस्त्रे जप्त केली.याप्रकरणी पोलीस शिपाई गिरीश गणपत नेवसे यांच्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४९८/२०२६ नुसार शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही आरोपींविरुद्ध मिळून यापूर्वी ११ गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण आणि मारहाण यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. काही प्रकरणांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गतही गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांतील दोषसिद्धीबाबत स्वतंत्र न्यायालयीन निष्कर्ष लागू राहतील.

जप्त शस्त्रे कोठून आणली, ती तालमीत कोणी लपवली, कोणावर हल्ल्याचे नियोजन होते आणि आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी करीत आहेत.पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मनीषा ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.या पथकात पोलीस उपनिरीक्षक टेळकीकर, हवालदार रामचंद्र शिंदे, अभिजीत एकशिंगे, शिपाई गिरीश नेवसे, सादिक काझी आणि अक्षय सिताफ यांचा सहभाग होता. गुन्हा नोंदणीची कार्यवाही हवालदार बनसोडे यांनी केली.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi