प्रतिनिधी.
पुणे शहरातील घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक क्रमांक २ ने महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. लॅपटॉप व मोबाईल चोरी करणाऱ्या दोन आंतरराज्यीय आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून एकूण ८ लॅपटॉप व ८ मोबाईल असा सुमारे ५ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे हडपसर, खराडी व चंदननगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण आठ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपींची नावे
१) कुमार मरीअप्पन (वय ३३ वर्षे), रा. त्रिपतूर, अंबूर, ओडिया राज पलियम, राज्य तामिळनाडू.
२) कृष्णा औलोडन (वय २५ वर्षे), रा. तामिळनाडू.
पोलिसांनी असा लावला आरोपींचा माग
दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक क्रमांक २, गुन्हे शाखा, पुणे शहर येथील अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार परेश सावंत व पोलीस अंमलदार प्रफुल्ल मोरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपींचा शोध घेण्यात आला. त्यानुसार वरील दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून चोरीचे ८ लॅपटॉप व ८ मोबाईल असा एकूण ५ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
उघडकीस आलेले गुन्हे
या कारवाईत खालील आठ गुन्हे उघडकीस आले आहेत.
१) हडपसर पोलीस ठाणे — गुन्हा रजिस्टर क्रमांक ७०१/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५.
२) खराडी पोलीस ठाणे — गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५.
३) खराडी पोलीस ठाणे — गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५.
४) चंदननगर पोलीस ठाणे — गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५.
५) खराडी पोलीस ठाणे — गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५.
६) खराडी पोलीस ठाणे — गुन्हा रजिस्टर क्रमांक २०६/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५.
७) खराडी पोलीस ठाणे — गुन्हा रजिस्टर क्रमांक २१६/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५.
८) चंदननगर पोलीस ठाणे — गुन्हा रजिस्टर क्रमांक २८२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई
मा. श्री. अमितेश कुमार साहेब, पोलीस आयुक्त, पुणे शहर; मा. श्री. संजय दराडे साहेब, पोलीस सहआयुक्त, पुणे शहर; मा. श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर; मा. श्री. हसन गोहर साहेब, पोलीस उपायुक्त, गुन्हे, पुणे शहर; तसेच मा. श्री. शंकर खटके साहेब, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे ३, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष तानवडे, सहायक फौजदार ज्योतिबा कुरळे, पोलीस हवालदार परेश सावंत (बक्कल क्रमांक ४०१९), पोलीस हवालदार महेश बारवकर (बक्कल क्रमांक ६७५२), पोलीस अंमलदार प्रफुल्ल मोरे (बक्कल क्रमांक ९०८९), पोलीस अंमलदार सचिन कांबळे, महिला पोलीस हवालदार रुपाली सूर्यवंशी व पथकातील इतर अधिकारी आणि अंमलदार यांनी सहभाग घेतला.
गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे चोरीच्या गुन्ह्यांना आळा
गोपनीय माहितीचे अचूक विश्लेषण, प्रभावी तपास आणि पथकातील अधिकारी व अंमलदार यांच्यातील समन्वयामुळे ही कारवाई यशस्वी झाली. आंतरराज्यीय गुन्हेगारीच्या साखळीचा शोध घेण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरली असून, पुणे शहरातील नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिसांकडून सातत्याने प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत.
