मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 12 November 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

रस्त्यावर केक कापून फटाके फोडणाऱ्या तरुणांना पोलिसांचा दणका; सात जणांवर गुन्हा दाखल

mnewsmarathi 12 Nov 2026 1 मिनिट वाचन 4,408 वाचन

प्रतिनिधी

​पुणे: सार्वजनिक रस्त्यावर केक कापून आणि फटाके फोडून वाहतूक व नागरिकांना त्रास देणाऱ्या सात तरुणांवर विश्रांतवाडी पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास धानोरीतील चौधरी नगर (लेन नं. ५) येथे काही तरुण भररस्त्यात केक कापून फटाके फोडत असल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून विश्रांतवाडी पोलिसांच्या धानोरी बीट मार्शलला मिळाली. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच संबंधित तरुण तेथून निघून गेले होते.

​

विश्रांतवाडी पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने या तरुणांचा शोध घेतला. या प्रकरणी आर्यन जयराम घिरे, अविष्कार अविनाश उत्तेकर, लक्की संजीव बेद, प्रेम रवि काशीद, अजय लक्ष्मण ढगे (सर्व रा. चौधरी नगर, धानोरी) आणि त्यांच्या इतर दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १८९(२), १९१(२), २७०, २८५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ आणि ११२/११७ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

​

​”सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर केक कापून फटाके वाजवणे हा कायदेशीर गुन्हा आहे. नागरिकांनी असे कृत्य करू नये; अन्यथा संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”

— चिलुमुला रजनिकांत, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ०४, पुणे शहर)

​

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त चिलुमुला रजनिकांत, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल जैतापुरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे आणि पोलीस निरीक्षक संपतराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल उगले व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार कृष्णा माचरे, संजय बादरे, वामन सावंत, संपत भोसले, विशाल गाडे, धवल लोणकर, स्वप्नील कांबळे, किशोर भुसारे, होना साबळे आणि अक्षय चपटे यांनी केली.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi