प्रतिनिधी
गंभीर गुन्हे करून पोलिसांना गुंगारा देत फरार राहणाऱ्या आरोपींचे आता काही खरे नाही! वडगाव निंबाळकर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत जबरी चोरी आणि खुनाच्या प्रयत्नातील दोन फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे, जबरी चोरीतील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी चक्क वेशांतर करून सापळा रचला आणि अत्यंत शिताफीने त्याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईने परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
वेशांतर करून जबरी चोरीतील आरोपीला पकडले!
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 154/2026, भारतीय न्याय संहिता कलम 309(6) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील पवन सॅंडल काळे (रा. विडणी, ता. फलटण, जि. सातारा) हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. पोलिसांना सातत्याने गुंगारा देणाऱ्या या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेशांतराची रणनीती आखली. अखेर पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेत अटक केली.
खुनाच्या प्रयत्नातील दुसरा फरार आरोपीही पोलिसांच्या जाळ्यात!
दुसऱ्या कारवाईत खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी रवींद्र तात्याबा खामगळ (रा. खामगळवाडी, ता. बारामती, जि. पुणे) याला पोलिसांनी अटक केली. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 77/2026, भारतीय न्याय संहिता कलम 109, 118(2) अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल होता.
सहायक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही उल्लेखनीय कामगिरी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस हवालदार हृदयनाथ देवकर, अनिल खेडकर, संदीप गायकवाड, पोलीस शिपाई विकास येटाळे, सचिन घाडगे, आबा जाधव, नरेंद्र यादव, सूरज धोत्रे, नागनाथ परगे तसेच चालक होमगार्ड संदीप कसबे यांनी सहभाग घेतला.
फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्याची वडगाव निंबाळकर पोलिसांची ही कामगिरी कौतुकास्पद ठरत आहे. गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना शोधून काढण्याची पोलिसांची तत्परता आणि तपास कौशल्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
ताज्या बातम्या
वडगाव निंबाळकर पोलिसांचा फरार आरोपींवर सर्जिकल स्ट्राईक! जबरी चोरी आणि खुनाच्या प्रयत्नातील दोन फरार आरोपी जेरबंद; एकाला पकडण्यासाठी पोलिसांनी केले वेशांतर!
