करंजे गावच्या सभासदांनी दिला सोमेश्वर च्या चेअरमन संचालक मंडळाला इशारा.

माझा जिल्हा

संपादक मधुकर बनसोडे.

 सोमेश्वर

विध्यालय सोमेश्वरनगर भाग शाळा करंजे .या शाळेकङे सोमेश्वर कारखाना चेअरमन सो.व संचालक मंङळ लक्ष देताना दिसत नाहीत. पालकांनी शाळे बाबतीत अनेक वेळा तक्रारी केल्या.पण लक्ष कोणी देत नाही.कायम टोलवा टोलविच्या उत्तरांचा सामना करावा लागत आहे.या शाळेत आज दिनांक 19/1/2023 रोजी घङलेली घटना.सोमेश्वर कारखाना सभासद श्री.सचिन यशवंत चौधरी यांचा मुलगा इयत्ता सातवी मध्ये शिकत आहे.

त्याला सकाळी शाळा भरल्यावर प्रांतविधीला लागले.प्रांताविधीची शाळेत व्यवस्था नाही.सर्व संडास मुतारीची दुरावस्था झालेली आहे.त्यामूळे विध्यार्थी मायकल याने प्रांतविधी रोखून धरली.त्यामूळे त्याच्या पोटात वेदना होऊ लागल्या.शिक्षकांनी पालकांना फोन करून बोलावून घेतले.शिक्षकांनी शाळेच्या गैरसोईचा पाढा वाचला.आम्हाला प्रांतविधी साठी जायाचे म्हटले तरी क्लास सोङून मोटारसायकल घेऊन दूर जावे लागते.मंग मुलींची आवस्था काय.तरी सोमेश्वर कारखाना व्यवस्थापक मंङळ लक्ष देतील का नाही.नाहीतर करंजे पंचक्रोशीतील सर्व सभासद मंङळी चेअरमन व संचालक मंङळ यांच्या विरोधात मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सह्यांचे निवेदन देणार किंवा शाळेला टाळे ठोकणार आसे सुखदेवराव शिंदे बुवासाहेब हूंबरे.शिवाजी शेंङकर भाऊसाहेब हूंबरे अनेक सभासद मंङळींनी बोलून दाखवले.