वंचित आघाडी व उद्धव ठाकरे शिवसेना युती म्हणजे परीवर्तनाची नांदी

राजकीय

प्रतिनिधी

 वंचित आघाडीचे सर्वेसर्वा अँड. प्रकाश आंबेडकर व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज झालेली युती ही आगामी काळात होणा-या परीवर्तनाची नांदी असुन ती काळाची गरज होती अशी प्रतिक्रिया वंचित आघाडीचे बीड पुर्व जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे यांची धरनिरपेक्ष भूमिका ही या युतीसाठी पुरक होती. धर्मांध शक्ती लोकशाही मूल्ये पायदळी तुडवुन चुकीच्या मार्गाने सत्ता हस्तगत करत आहेत. यांना रोखण्यासाठी ही झालेली युती निश्चितच सक्षम व सकारात्मक आहे. यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा मिऴाली असुन कार्यकर्त्यांमधे उत्साहाचे वातावरण आहे. अँड प्रकाश आंबेडकर हे आंबेडकरी समुहासह बहुजन समाजाचे लोकाभिमुख कुशल नेतृत्व आहे. त्यांच्या सोबतची भीमशक्ती व उद्धव ठाकरेंची शिवशक्ती ही महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी असेल असेही प्रतीपादन शैलेश कांबऴे यांनी केले. आगामी निवडणुकांसदर्भात दोन्ही कडील वरीष्ठ मंडऴी निर्णय घेतील त्या प्रमाणे काम करण्याचा निर्णय यावेळी कांबळे यांनी जाहीर केला तसेच यावेळी फटाके वाजवुन व मिठाई वाटुन वंचितच्या कार्यकर्त्यांनी या युतीचे स्वागत केले.