• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती तालुका पोलिसांची धमाकेदार कामगिरी एमआयडीसी येथील आय एस एम टी कंपनीमध्ये 26,00,000/-रुपये किमतीच्या लोखंडाची चोरी करणारे चोर पकडले व चोरलेला मालही जालन्यावरून परत आणला
Image

बारामती तालुका पोलिसांची धमाकेदार कामगिरी एमआयडीसी येथील आय एस एम टी कंपनीमध्ये 26,00,000/-रुपये किमतीच्या लोखंडाची चोरी करणारे चोर पकडले व चोरलेला मालही जालन्यावरून परत आणला

प्रतिनिधी

बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत एमआयडीसी परिसरामध्ये मोठमोठ्या औद्योगिक कंपन्या आहेत.

दिनांक 4/ 10 /2022 रोजी श्री संजय श्रीमंत मसतुद मॅनेजर आय एस एम टी कंपनी एमआयडीसी बारामती जिल्हा पुणे यांनी आय एस एम टी कंपनी मधील सुमारे 26,00,000/-लाखाचे लोखंडाचे रोल दिनांक 20/9/2022 ते 4/10/2022 चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी तारेच्या कंपाउंड मधून प्रवेश करून चोरून नेल्याबाबत तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने बारामती तालुका पोलीस येथे गुन्हा रजिस्टर नंबर 514/2022 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रभाकर मोरे यांनी त्यांचे तपास पथकास सदर चोरट्यांना लवकरात लवकर शोधून काढण्याबाबत सक्त सूचना व मार्गदर्शन केले होते. त्यावरून तपास पथकातील पोलीस अंमलदार राम कानगुडे पोलीस नाईक अमोल नरोटे पोलीस कॉन्स्टेबल दत्ता मदने ,शशिकांत दळवी व दीपक दराडे यांनी रात्रंदिवस आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली तांत्रिक माहितीच्या आधारे तपास पथकास गुन्ह्याची उकल होण्यास मदत झाली. आय एस एम टी कंपनीमध्ये सेक्युरिटी म्हणून नोकरी करत असलेला कैलास शांताराम लष्कर रा. राक्षेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर याने आपल्या गावाकडील तीन साथीदार 1. आकाश लहू ननवरे वय 21 वर्ष 2. आशिष कांतीलाल लष्कर वय 20वर्ष 3. आकाश सुनील जाधव. वय 19 वर्ष सर्व रा. राक्षेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर. यांच्या मदतीने सदर लोखंडी रोलची चोरी केली. चोरलेले लोखंड बारामती येथील 1. सलमान इम्तियाज खान वय 26 वर्ष राहणार बारामती जिल्हा पुणे. 2. धर्मेंद्र कुमार राजकुमार चौधरी वय 38 वर्ष राहणार भिगवन तालुका इंदापूर जिल्हा पुणे या दोघांना विकले. त्यांनी सदरचे लोखंड पुढे जालना या ठिकाणी तेजस सुरेश लोंकलकर उर्फ तेजा शेठ वय 40 वर्ष रा. तुळजाभवानी नगर जालना याला विकले . वरील आरोपी यांना राशीन तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथून तसेच बारामती येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. तसेच जालना येथून तेजस लंकन कर याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. तपास अधिकारी स पो नी शेंडगे मॅडम , सपोनी श्री राहुल घुगे व बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथक हे जालना येथे पोहोचले गुन्हेगारांना तर पकडलेच जालना येथून सदर गुन्ह्यातील 100 % रिकवरी करून लोखंड जालन्यावरून परत बारामती ला आणले . त्यामुळे गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल व चोरी करण्यासाठी वापरलेले वाहन मिळून 31 ,00,000 /- रुपये रिकवरी करण्यात बारामती तालुका पोलिसांना यश आले आहे त्यामुळे एमआयडीसी मधील सर्व कंपन्यातून बारामती तालुका पोलिसांचे कौतुक होत आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री अभिनव देशमुख साहेब पुणे ग्रामीण , अप्पर पोलीस अधीक्षक श्री मिलिंद मोहिते साहेब बारामती विभाग पुणे ग्रामीण . उपविभागीय पोलिस अधिकारी श्री गणेश इंगळे साहेब बारामती विभाग. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री प्रभाकर मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री योगेश लंगुटे , श्री राहुल घुगे , महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे मॅडम पोलीस हवा. राम कानगुडे . पोलीस नाईक अमोल नरुटे , पो. कॉ. दत्ता मदने ,शशिकांत दळवी, दीपक दराडे , महिला पोलीस कॉन्स्टेबल रचना काळे यांनी केली आहे. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे मॅडम बारामती तालुका पोलीस स्टेशन या करीत आहेत .

Releated Posts

श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न…

प्रतिनिधी          निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन…

ByBymnewsmarathi Jan 27, 2026

यंदा बारामतीचे प्रदर्शन आठ दिवस ! कृषक प्रदर्शन शनिवारपासून; ११ वर्षांची परंपरा जपली

प्रतिनिधी बारामती अँग्रीकल्चरल -डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राचे यंदाचे कृषिप्रदर्शन ‘कृषक ‘२०२६ चे आयोजन केले असून १७…

ByBymnewsmarathi Jan 12, 2026

सोमेश्वर अदा करणार विना कपात ऊस बिले. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.

प्रतिनिधी शासन नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी) रु.३२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Jan 9, 2026

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे येथे एस टी – दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

कोऱ्हाळे बुद्रुक – पणदरे दरम्यान हॉटेल मयुरी नजीक एस टी बस व दुचाकीच्या अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा…

ByBymnewsmarathi Jan 4, 2026