मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Sunday, 25 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
खेळ

श्री भैरवनाथ जनसेवा विद्यालय उंडवडी क.प आट्यापाट्या क्रीडा प्रकारात जिल्ह्यात अव्वल.

mnewsmarathi 25 Oct 2026 1 मिनिट वाचन 4,460 वाचन

प्रतिनिधी

उंडवडी क.प – जिल्हा परिषद पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय जिल्हास्तरीय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेमध्ये श्री भैरवनाथ जनसेवा विद्यालय उंडवडी क.प १७ वर्षे वयोगट मुले व १७ वर्षे वयोगट मुली यांनी जिल्हास्तरीय आट्यापाट्या सांघिक विजेतेपद पटकावले.

१४ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघामध्ये

जराड रोहित अजित, बनकर ओम सुनील,काळे कुणाल किरण,जराड संस्कार दत्तात्रय,साळुंके आर्यन अनिल,भोईटे स्वराज प्रमोद,घुले जयराम आप्पा,आटोळे अथर्व कैलास,सय्यद असद जावेद, चव्हाण सुरज बापूराव,झगडे सत्यजित सोमनाथ आणि कोकरे आर्यन राहुल यांनी

तर १७ वर्षीय मुलींच्या संघामध्ये

कु.सिद्धी राजेंद्र साळुंके,सायली चंद्रकांत जराड,सृष्टी बाळासाहेब जाधव, जान्हवी नवनाथ जराड,कादंबरी किरण जराड,अंजली अनिल साळुंके,काजल नवनाथ जराड, साक्षी लक्ष्मण साळुंके,सोनाक्षी बाळासो बनकर,किरण गणेश गोलांडे, प्रणिता बापू चव्हाण,रिया राजकुमार जराड,दीक्षा पप्पू जगताप

 

या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करून पुणे जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाने स्पर्धा विजेते होण्याचा मान दोन्ही संघांनी मिळवला.यामुळे विद्यालयाचे दोन्ही संघ विभागीय पातळीवर खेळण्यासाठी निवडले गेले आहेत.

 

विद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री.घुले संजय जगन्नाथ व श्री.वाडते रवींद्र सुदाम यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. श्री भैरवनाथ शिक्षण मंडळाचे चेअरमन मा.श्री‌.अशोक आप्पा साळुंके,सचिव मा.श्री.सतीशराव जराड,सर्व संचालक मंडळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक वल्लभ चौधरी सर यांनी सर्व खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.

 

वरील सर्व खेळाडूंचे शाळा व शाळेच्या परिसरात कौतुक होत आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi