सकाळ एन.आय.ई.’ विनोदी लेखन स्पर्धेत श्री बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाचे यश. लहान गटातून ऋतुजा बनसोडे. तर मोठ्या गटातून चमेली पवार

खेळ

प्रतिनिधी

निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सकाळ एन. आय. ई. (न्युजपेपर इन एज्युकेशन)च्या वतीने राबविण्यात आलेल्या, विनोदी लेखन स्पर्धेमध्ये, ‘अशी झाली फजिती’ या विषयावरील लेखन स्पर्धेत सहभाग घेतला होता. ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या वाचन व लेखन कौशल्याला वाव मिळावा तसेच विद्यार्थ्यांचे कला कौशल्य व संवाद कौशल्य वाढीस लागावे या हेतूने राबवली गेली होती.

या स्पर्धेत इ.५ वी ते ७ वी या गटात, कु. बनसोडे ऋतुजा मधुकर व इ.८वी ते १०वी या गटात कु.पवार चमेली धर्मराज या विद्यार्थिनींच्या लेखाला, सर्वोत्तम लेख म्हणून सकाळच्या वतीने निवड करण्यात आलेली आहे. या विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सकाळ कडून लवकरच गौरवण्यात येणार आहे.

या विद्यार्थिनींना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.दिपाली ननावरे व विद्यालयाचे मराठी विषय शिक्षक श्री.राजाराम भगत व श्री.राजेंद्र खुडे यांनी मार्गदर्शन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, मा.श्री.सतीशभैया काकडे दे., उपाध्यक्ष मा. श्री.भीमराव बनसोडे सर व मानद सचिव मा. श्री.मदनराव काकडे दे.यांनी केले.