मु.सा.काकडे महाविद्यालयातर्फे खेळाडू विद्यार्थ्यास मदत

खेळ

प्रतिनिधी

 सोमेश्वर येथील मु.सा काकडे महाविद्यालयामध्ये सुजल सोमनाथ सावंत प्रथम वर्ष कला शाखेतील खेळाडूस महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तथा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत भैय्या काकडे- देशमुख यांच्या हस्ते सहा हजार रुपयांचा चेक सुपूर्द करण्यात आला तसेच या आधी नेपाळ येथे संपन्न झालेल्या अंतरराष्ट्रीय स्पर्धेत 400 मीटर धावणे मैदानी स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल तृतीय वर्ष वाणिज्य शाखेतील वैष्णवी थोपटे या विद्यार्थिनीला देखील पाच हजार रुपये चा चेक देऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे सर, संस्थेचे सह-सचिव सतीश लकडे सर, वरिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. बाळासाहेब मरगजे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) प्रमुख प्रा.अच्युत शिंदे, प्रा. दत्तराज जगताप उपस्थित होते.

   प्रथम वर्ष कला शाखेतील सुजल सावंत या खेळाडूची आंतर महाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धेत १५०० मीटर, पाच हजार मीटर व दहा हजार मीटर धावणे स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सतीश भैय्या काकडे- देशमुख,अभिजीत भैय्या काकडे-देशमुख यांनी त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे यांनी महाविद्यालयातील विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांच्या पाठीशी हे महाविद्यालय पुढील काळातही खंबीरपणे उभे राहील व त्यांना लागणारे क्रीडा साहित्य व आर्थिक स्वरूपाची मदत केली जाईल असे आश्वासन दिले.वरिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. बाळासाहेब मरगजे यांनी खेळाडूस मार्गदर्शन केले.