प्रतिनिधी.
निंबुत येथे तीन सेट जिमची साहित्य, एक ओपन जिम, तसेच भजनी मंडळासाठी लागणारे साहित्य मा आरोग्य व बांधकाम सभापती श्री प्रमोद काकडे यांच्या फंडातून नींबूत येथे वाटप करण्यात आले.
निंबूत गावातील तरुण वर्गांनी प्रमोद काका यांच्याकडे जिमचे साहित्य मागणी केल्यानंतर त्वरित त्याच्यावरती अंमलबजावणी करण्यात आली यामुळे तरुण वर्गाकडून प्रमोद काकडे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
सदर कार्यक्रम ग्रामपंचायत निंबूत येथे सकाळी दहा वाजता संपन्न झाला, तसेच अकरा वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे संपन्न झाला. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत काकडे,नींबूत गावचे माजी सरपंच राजकुमार बनसोडे, विद्यमान उपसरपंच अमरदीप काकडे, सदस्य सुरेखा बनसोडे, दत्ता आतार, आरती काकडे, वैशाली काकडे,
सुवर्णा लकडे, उषा पवार, प्रमोद बनसोडे, हेमंतराव काकडे, नंदू काकडे, विक्रम काकडे, विलास बनसोडे, मिलिंद तरुण मंडळाचे अध्यक्ष, निंबुत गावचे ग्रामसेवक राठोड, क्लार्क भाऊसो कोळेकर, व कर्मचारी वृंद, सर्व सदस्य आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते