भोसरी येथे लोहार समाजाचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

माझा जिल्हा

प्रतिनिधी

भोसरी(पुणे) – लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून रविवार दि ५ फेब्रुवारी रोजी भोसरी येथे लोहार समाजाचा स्नेहमेळावा विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला.

    सकाळी १० सुरू झालेल्या पहिल्या सत्रात कार्यक्रमात भजन, विश्वकर्मा पूजा, आरती झाली . सकाळी १० ते ११ या वेळेत रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या.

मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून दुसऱ्या सत्राची सुरूवात संस्थेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब शेलार यांच्या प्रास्ताविकाने झाली. उपस्थित मान्यवरांचे सत्कार झाल्यावर श्री तानाजी ढगे यांच्या *झगरं* या लोहार समाज जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशनाबरोबरच त्यांच्यांत *प्रॉमिस* आणि *रंग* या दोन कविता संग्रहाचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा *जीवन गौरव* पुरस्कार नागपूर येथील बहुअंगी व्यक्तीमत्व डॉ वसंत रामचंद्र साळवणकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख र ५००१ , स्मृती चिन्ह,शाल , श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यानंतर मान्यवरांचे मनोगत झाले.त्यामध्ये पुण्यातील श्री सतीश कसबे यांनी काश्मीरमधील लोहार समाजाच्या पहिल्या सम्राटपासून ते शेवटच्या जयसिंग लोहार राजाचा इतिहास कथीत करून उपस्थितांना तुम्ही राजपुत्र आहात असे म्हणत आपल्या आक्रमक भाषण शैलीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

तिसऱ्या सत्रात विश्वकर्मा एंटरटेनमेंट निर्मित *कलाकार आपल्यातला* या कार्यक्रमात कु.अधिरा,सुप्रिया लोहार,पूजा मंचरकर यांच्या नृत्याने उपस्थितांची वाहवा मिळवली तर वसंत पी वसंत,मंगल, सुनंदा यांच्या बहारदार युगल गितांनी उपस्थितांचे छान मनोरंजन केले.विशाखा लोहार सोलो गायन केले.तर चंद्रकांत तर चंद्रकांत पोपळघट व सविता अंकुशे यांनी भक्ती गीते गायली. सर्वात जास्त शुभांजली थोरात हिच्या लावणी नृत्याने प्रेक्षकांना प्रभावीत झाले.

   शेवटच्या सत्रात *खेळ पैठणीचा औदुंबर भाऊंजीचा* कार्यक्रमात प्रभू विश्वकर्मा यांच्या जीवनावर आधारित प्रश्नावली सादर करून औदुंबर यांनी उपस्थितांच्या ज्ञानात भर घातली. त्यानंतर महिलांसाठी विविध खेळातून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले. मानाची प्रथम क्रमांकाची पैठणी सौ पूजा शिरसाट यांनी पटकावली तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस ओव्हन सौ ऋतूपर्णा चव्हाण तर तृतीय क्रमांकाचे इंडक्शन कुकवेअर सौ माधूरी लोहार यांना मिळाले. दरम्यानच्या काळात वर्षभरात झालेल्या घरगुती गणपती, गौरी सजावट स्पर्धा, निबंध स्पर्धा यांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

 कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड स्थायी समिती अध्यक्ष विलासभाऊ मडिगेरी यांच्या सह पुणे जिल्हा बारा बलुतेदार महासंघाचे सचिव संतोष कुमावत, आळंदी गाडी लोहार धर्मशाळेचे अध्यक्ष श्री दिलीप थोरात, विश्वकर्मा ट्रस्टचे विवेकानंद सूतार यांनी उपस्थित दर्शवली. या

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन लोहार उत्सव समिती आणि भक्ती शक्ती महिला मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते.

इंदापूर प्रतिनिधी डॉक्टर गजानन टिंगरे