मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Friday, 21 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

महाराष्ट्र राज्य कारागृह अधिकारी व कर्मचारी वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उदघाटन

mnewsmarathi प्रतिनिधी
February 7, 2023 1 मिनिटांचे वाचन 5004 वेळा पाहिले

प्रतिनिधी

महाराष्ट्र कारागृह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय वार्षिक क्रीडास्पर्धा ६ ते ९ फेब्रुवारी २०२३ या दरम्यान येरवडा येथील दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्या असून स्पर्धांचे उद्घाटन अपर पोलीस महांचालक व महानिरीक्षक,कारागृह व सुधरसेवा महाराष्ट्र राज्य अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले .

 यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, योगेश देसाई, प्राचार्य चंद्रमणी इंदुरकर,येरवडा कारागृह अधीक्षक शिवशंकर पाटील व राज्यातील विविध कारागृहांचे अधीक्षक व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 स्पर्धेत १०० मीटर धावणे, गोळाफेक, लांब उडी, ८०० मीटर धावणे, रिंग टेनिस, व्हॉलिबॉल, कबड्डी, कराटे,भालाफेक,४×१०० रिले, ४०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे, मॅटवरील कुस्ती ,चालणे इत्यादी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा