संपादक- मधुकर बनसोडे
बारामती -: डिजिटल मीडियाचे पत्रकार हे इंटरनेट द्वारे वेब पोर्टल काढून डिजिटल मीडिया पत्रकारिता माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या 2021 च्या गाईडलाईनुसार पालन करून पत्रकारिता करत आहेत. तसेच प्रिंट मीडिया ह्या हे RNI रजिस्टर असल्यामुळे साप्ताहिक असल्यास आठवड्यातून एकदा आपले साप्ताहिक प्रिंट करून वाटावे लागतात.
त्याची पीडीएफ करून किंवा ब्यानर बनवून व्हाट्सअप द्वारे प्रसारित करण्याचा अधिकार नाही हा नियम RNI ( केंद्रीय व प्रसारण मंडळ )चा आहे तसेच असे पीडीएफ किंवा बॅनर बनवून प्रसारित करणाऱ्यांवरती देखील RNI ( केंद्रीय व प्रसारण मंडळ )कारवाई केली जाते नियमाचे देखील पालन करणे गरजेचे आहे. तसेच डिजिटल मीडियाचे पत्रकार बोगस ठरवण्याचा अधिकार हा केवळ कोर्टाला आहे इतर कुठल्याही खात्याला नाही याचा देखील आपण अभ्यास करून माहिती घेऊन डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना बोगस म्हणावे.
काही प्रिंट मीडियाच्या RNI असणाऱ्या पत्रकारांचे न्यूज पोर्टल आहे त्यांचे म्हणणे आहे की आमचे पोर्टल अधिकृत आहे वास्तविक पाहता RNI( केंद्रीय व प्रसरण मंडळ ) नंबर टाकून पोर्टल अधिकृत होत नाही कारण की हे डिजिटल मीडियाचा विभाग माहिती व प्रसारण मंडळाकडे येतो व आपला विभाग हा RNI ( केंद्रीय व प्रसारण मंडळ )कडे येतो या गोष्टी माहिती असणे किंवा अभ्यास असणे गरजेचे आहे.
दोन्ही विभाग वेगळे असल्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचा संभ्रम करून घेऊ नये अर्धवट माहिती घेऊन कुठल्याही डिजिटल मीडियाच्या बांधवांवरती दडपण किंवा दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये. सुप्रीम कोर्ट मध्ये या संदर्भात वेगवेगळ्या डिजिटल मीडिया संघटनाने रिट पिटीशन कोर्टात दाखल केलेले असून लवकरच सर्व गोष्टी मार्गी लागणार आहेत याची देखील नोंद घ्यावी.अन्यथा डिजिटल मीडियाच्या संदर्भात चुकीचा प्रसार प्रचार करणाऱ्या वरती जे कोण संबंधित असतील त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल याची देखील त्यांनी नोंद घ्यावी.