वडगाव निंबाळकर ग्रामस्थांकडून महाशिवरात्र निमित्त मळद ते वलझडवाडी पायी पालखीचे स्वागत. 

माझा जिल्हा

प्रतिनिधी – फिरोज भालदार

जय गिरनारी वलझडवाडी दत्त दत्त नवनाथ असा जप करीत श्री क्षेत्र वलझडवाडी महाशिवरात्री निमीत्त, वडगाव निंबाळकर ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले व वडगाव निं. बंगला सार्वजनीक बांधकाम विभाग येथे विसावा व भोजनाचे आयोजित केले होते. श्री क्षेत्र मळद ता. बारामती ते श्री क्षेत्र वलझडवाडी,येथे पायी पालखी सोहळा, हजारो भक्तासमवेत सुरू आहे. मौजे अहीरे-मोरवे शिवेवरती,जय गिरनारी वलझडवाडी दत्तात्रय नवनाथ मंदीर, टेकडी आहे.ती टेकडी गिरनारचे दत्तात्रय आणि नवनाथ महाराज भ्रमंती करीत असताना, त्यांच्या पद स्पर्शाने पावन झालेले ठिकाण होय. चिले महाराज माहात्म्य या ग्रंथात स्थान तुमचेच ते गिरनार, स्थान तुमचेच ते गुरूशिखर, जनसागर त्या शिखरावर, लोटला आहे. असे चिले देवांनी मधु ठाकूर यांच्याकडून भैरवनाथ मंदीर जेऊर, कोल्हापुर येथे लिहून घेतले आहे,अगदी असाच जनसागर या कार्यक्रमनिमीत्त श्री क्षेत्र वलझडवाडी येथे जमतोय.

  मधु ठाकूर यांनी लिहिलेले चिले माहात्म्यातील प्रत्येक ओळीची, चिले महाराज यांच्या कार्याची आजही प्रचीती भक्तांना हा भक्त समुदाय पाहून येत आहे. दिनांक 13 फेब्रुवारी 2023 पासुन मळद ता. बारामती, येथून सुरु झाला आहे. पालखी सोहळा पहिला मुककाम व पहीले घोडे रिंगण हरी कृपा नगर बारामती येथे झाले, दुसरा मुककाम पणदरे ता बारामती भैरवनाथ मंदीर येथे झाला, तिसरा मुककाम व दुसरे घोडे रिंगण श्री क्षेत्र सोमेश्वर मंदीर येथे झाले. चौथा मुककाम दत्तघाट निरा येथे झाला असून पाचवा मुककाम वाघोशी ता.खंडाळा जि सातारा येथे आहे.दिनांक 18/2/2023 रोजी श्री क्षेत्र वलझडवाडी येथे तिसरे घोडे रिंगण असून महाशिवरात्री एकादशी निमीत्त दत्त दत्त नवनाथ गिरनारी टेकडीस तीन, रथ प्रदक्षिणा घातल्या जातात, रात्री 12.00 वाजता बेलफुले वाहण्याचा कार्यक्रम आहे. त्यानंतर पहाटे गिरनारी दत्त नवनाथ टेकडीस तीन पालखी प्रदक्षिणा घातल्या जातात. सकाळी 7.00 वा महाशिवरात्री एकादशी निमीत्त महाप्रसाद सुरू होतो. उपवास सोडला जातो. यासाठी हजारो भक्तांची जेवणाची , फराळाची सोय जय गिरनारी श्री.क्षेत्र वलझडवाडी दत्त दत्त नवनाथ मंदीरामार्फत केली जाते.

  या सोहळ्यास कोल्हापूर, जेऊर, पैजारवाडी, बारामती फलटण पुणे,मुंबई, सातारा, सांगली, कोकण, सर्व महाराष्ट्रातून भक्तगण येवुन लाभ घेतात. काही भक्त झारखंड राज्यातून या सोहळ्यात सहभागी होतात. या पालखी सोहळयात सहभागी भक्तांचे जेवण, राहण्याची सोय केली जाते. या साठी सर्वाचे गावोगावी सहकार्य मिळते. पोलीस प्रशासनाचे सहकार्य देखील मिळते. सर्व सुख दुःख विसरून भक्तगण सहभागी होवून आनंदाने हा पालखी सोहळा पार पडतो.

  या महाशिवरात्री एकादशी निमीत्त श्री क्षेत्र मळद ता. बारामती ते श्री क्षेत्र वलझडवाडी येथे सहा दिवस भक्त पायी चालत येतात.