सोमेश्वर च्या सभासदांना चेअरमन संचालक मंडळ न्याय देतील का? शिवाजी शेंडकर.

माझा जिल्हा

संपादक मधुकर बनसोडे.

     सोमेश्वर सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक सभासदांना कोण वाली आहे का.? आसे म्हणण्याची वेळ सभासदांवर आली आहे.शेतकी विभागाचा भोंगळ कारभार चालू आहे.शेतकी विभागाशी संपर्क केला आसता.आजून 15/6 ची ऊस तोङ चालू आहे.आशी न पटणारी माहिती मिळत आहे.

सोमेश्वर कारखाना संचालक मंङळ व चेअरमन साहेब बाहेरील गेटकेन धारकांचा ऊस गाळपास आणण्याची वल्गना करत आहे.परंतू सोमेश्वर चा सभासद उपाशी व गेटकेन धारक तुपाशी आशी आवस्था झाली आहे.बोलण्याचे तात्पर्य हाता तोंडाला आलेला ऊस जळून जाण्याच्या मार्गावर आहे.आपलेच सभासद बाहेरील कारखान्यांना ऊस देऊ लागले.साखरवाङी दत्त शुगर .शरयू या कारखान्यांनी परिपक्व ऊसाची पळवापळवी चालू केली आहे.आपला कारखाना रिकव्हरी नसलेला ऊस गाळप करत आहे.संचालक मंङळ या विषयावर लक्ष देईल का ? एवढा तरी सभासदांबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा.आजून आपला सभासदांचा 10वा 11वा ऊस गाळप झालेला नाही.गटात पहाणी केली आसता.सर्व मार्च एप्रिल मध्ये लागण केलेला ऊस येत आहे.पहीले सभासद मंङळींना प्राधान्य देणे गरजेचे आहे.परंतू आसे होताना दिसत नाही.शेतकी अधिकारी यांच्याशी संपर्क केला तर ते कायम कव्हरेज श्रेत्राच्या बाहेर आसतात.दाद मागायची कोणाला सोरटेवाङी.शेंङकरवाङी करंजे या परिसरातील सभासदांची वाईट अवस्था होऊन बसली आहे.संचालक मंङळ सभासदांचे हित जोपासत आहे का बाहेरील कारखान्यांचे आशी सभासद लोकांच्यात चर्चा आहे.शेतकी विभागाची सखोल चौकशी व्हावी.अशी मागणी महेश शेंङकर. शिवाजी शेंङकर प्रदिप शेंङकर मृणाल कोंढाळकर दादा चौधरी आशा बर्याच सभासद लोकांनी केली आहे.