मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

मॅरेथॉन मुळे उद्या सकाळी वाहतुकीमध्ये बदल

mnewsmarathi 18 Feb 2023 1 मिनिट वाचन 9,004 वाचन

प्रतिनिधी

उद्या बारामती मध्ये शरयू फाउंडेशन ची हाफ मॅरेथॉन आयोजित केलेली आहे. सदरची मॅरेथॉन भिगवन रोड पेन्सिल चौक मार्गे एमआयडीसी रोडने कटफळ चौकापर्यंत आहे. त्यासाठी भिगवन रोडची एमआयडीसी कडे जाणारी व एमआयडीसीतून कटफळ कडे जाणारी डावी बाजू फक्त धावपटूंसाठी असेल उजव्या बाजूने ट्राफिक हे कोर्ट कॉर्नर रिंग रोड पर्यंत चालू असेल.

तसेच रेल्वे उड्डाणपूल सातव चौकाकडून येणारी वाहतूक ही उड्डाणपूल उतरल्यानंतर रेल्वे रुळाकडेने एमआयडीसी कडे डायव्हर्ट करण्यात आलेली आहे. सिनेमा रोड तीन हत्ती चौकाकडून येणारी वाहतूक ही खाऊ गल्ली जेष्ठ नागरिक संघ टीसी कॉलेज बाजूने वळवण्यात आलेली आहे. एमआयडीसीतील सर्व अवजड वाहने ही शक्यतो सकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत बाहेर आणू नयेत

मॅरेथॉन साठी येणाऱ्या धावपटूंनी आपली वाहने शारदा प्रांगण कॅनल कडेला खाऊ गल्ली ज्येष्ठ नागरिक संघ जैन मंदिराकडून रिंग रोड करे देशपांडे हॉस्पिटल जाणाऱ्या रोडवर अशोक नगर तसेच कॅनॉलच्या कडेने परकाळे पुलापर्यंत क्रीडा संकुल समोर पार्किंग करावे. सदरचा वाहतूक बदल फक्त सकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत ज्यावेळेस वर्दळ नसते त्यावेळेस असेल.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi