निंबुत ग्रामपंचायतची ग्रामसभा खेळीमेळीत संपन्न.

माझा जिल्हा

संपादक मधुकर बनसोडे.

 आज दिनांक 23/ 2 /2023 रोजी सकाळी 11 वाजता निंबुत ग्रामपंचायत कडून ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ही ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालय प्रारंगणामध्ये सकाळी 11 वाजता सुरू झाली.

 शैक्षणिक,आरोग्य, रस्ते, स्वच्छता, अशा अनेक विषयांवर ती या ग्रामसभेमध्ये चर्चा झाल्या.

 येणाऱ्या काही दिवसांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाकडून ग्रामपंचायत निंबूत अंतर्गत येणाऱ्या सर्व मालमत्ता ची मोजणी करून अधिकृतरित्या कर आकारणी केली जाणार असल्याची माहिती यावेळेस ग्रामपंचायत ग्रामसेवक राठोड यांनी दिली. पंधराव्या वित्त आयोगांमधून किमान 25 ते 30 टक्के खर्च हा शैक्षणिक कामासाठी खर्च करण्यात यावा असा ठराव सर्वानुमते ग्रामसभेत ठेवण्यात आला. तसेच काही ग्रामस्थांमधून नींबूत परिसरामध्ये अनाधिकृतपणे दारू व्यवसाय केला जातो या वरती देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक, कर्मचारी वृंद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरची ग्रामसभा ही खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली