डोळ्याने अंध असूनही पाटबंधारे खात्यामध्ये आपले कर्तव्य बजावणारे बाळासाहेब शिंदे यांचा आज सेवा निवृत्ती कार्यक्रम संपन्न.

माझा जिल्हा

वडगाव निं. प्रतिनिधी- फिरोज भालदार

बारामती ! वडगाव निंबाळकर येथील पाटबंधारे खात्यामध्ये गेल्या तेवीस वर्षापासून आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून एक चांगल्या पद्धतीचे काम करणारे व्यक्ती म्हणून ज्यांचा गुणcगौरव केला जातो. अशा महान व्यक्ती आज पाटबंधारे खात्यामधून सेवानिवृत्त होत आहे. खरोखरच त्यांचा कामाचा उल्लेख या ठिकाणी करणे गरजेचे असल्याचे मत बहुजन हक्क परिषदेचे बारामती तालुक्याचे युवक अध्यक्ष अमोल गायकवाड यांनी सेवा स्फूर्ती समारंभाच्या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना वरील विधान केले आहे.

  बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे जलसंपदा विभागांमध्ये कार्यरत असणारे बाळासाहेब शिंदे यांचा सेवास्फूर्ती समारंभ अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जनता शिक्षण संस्थेचे स्वातंत्र्य विद्या मंदिरचे माजी प्राचार्य विठ्ठलराव हिरवे,बहुजन हक्क परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष पै. नानासाहेब मदने वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत सदस्य अजित भोसले,संजय साळवे , बहुजन हक्क परिषदेचे बारामती तालुक्याचे युवक अध्यक्ष पत्रकार अमोल गायकवाड बारामती तालुका खादी ग्राम उद्योग समूहाचे संचालक पांडुरंग पवार युवा नेते अतुलशेठ शिंदे,इक्बाल शेख,भूपेंद्र आगम व जलसंपदा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी माजी प्राचार्य विठ्ठलराव हिरवे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिंदे हे अंध व्यक्ती असताना सुद्धा जलसंपदामध्ये काम करत असतात आपल्यावर जी जबाबदारी दिलेली आहे. ते अतिशय चोखपणे पार पाडत असतात.त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. अशा पद्धतीचे आपले मनोगत व्यक्त केले.

 यावेळी बाळासाहेब शिंदे यांना मानाचा तुरा,शाल,श्रीफळ व हार घालून वडगाव निंबाळकर ग्रामस्थांनी त्यांना सेवा स्फूर्ती समारंभाच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल गायकवाड यांनी तर आभार पैलवान नानासाहेब मदने यांनी मानले.