मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

बारामती! निंबूत येथील अपघातामध्ये उपचारादरम्यान अपघातग्रस्ताचा मृत्यू . 

mnewsmarathi 16 Mar 2023 1 मिनिट वाचन 9,928 वाचन

प्रतिनधी – फिरोज भालदार

बारामती तालुक्यातील निंबुत गावचे हद्दीत निंबुत – बंधाऱ्यावर नामे विलास तुकाराम वाबळे वय. 70 वर्षे रा. पाडेगाव मोहितेवस्ती ता. फलटण जि.सातारा ही व्यक्ती दि.2/12/2022 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास निंबुत गावच्या हद्दीत नींबुत बंधाऱ्यावरून नींबुत बाजूकडून त्यांच्या ताब्यातील हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल नं. एम .एच 42 यु 5201 ही स्वतः चालवत असताना पाडेगाव मोहीतेवस्ती यादिशेने चाले असता. यावेळेस त्यांची गाडी भरधाव वेगाने घेऊन जात असताना त्यांची मोटारसायकलसह स्लीप होऊन 40 फूट अंतरावर बंधाऱ्याचे खाली पडल्याने अपघात झाला.

 अपघात होताच प्राथमिक दर्शनी त्यांला संचेती हॉस्पिटल पुणे येथे न्हेण्यात आले होते. या उपचारादरम्यान त्यांला डोक्यास व मांडीला , पायाला, झालेल्या जखमांमुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सदरचे अपघात झाल्यास अपघाताची फिर्याद हे मृत व्यक्ती च्या मुलाने अमर विलास वाबळे यांनी दाखल केली असता . त्यांची फिर्याद अशी की 5 /12 /2022 रोजी मयत झाले असून सदरच्या अपघातास फिर्यादीचे वडील हे स्वतः स्वतःचे मृत्यूस व मोटार सायकलचे नुकसानीस कारणीभूत झाले आहेत म्हणून फिर्यदिने त्यांचेविरूधात करंजेपुल ओपी वरून वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे .

लेखक

mnewsmarathi

M News Marathi