• Home
  • इतर
  • आशा सोडलेले मोबाईल पोलिसांकडून संबंधितांना परत
Image

आशा सोडलेले मोबाईल पोलिसांकडून संबंधितांना परत

प्रतिनिधी.
माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी. पोलीस दल हे सेवा देणारे खाते निर्माण व्हावे म्हणून हरवणारे, चोरी होणारे मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर शोधून ते संबंधितांना परत द्यावे अशा सूचना सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना प्रथम गुन्हे बैठकीपासून दिलेले आहेत आणि त्याचा ते दर बैठकीत आढावा घेत असतात.


गहाळ झालेला चोरी झालेला मोबाईल त्याचे आय एम ई आय क्रमांक हे सायबर सेल ला दिल्यानंतर ते सतत त्याचा शोध घेत असतात त्याचा डाटा प्रत्येक पंधरा दिवसाला परत परत मागून शोध घेत असतात आणि तो मोबाईल ट्रेकिंग मध्ये आल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनला कळवला जातो. बारामती शहर पोलिसांनी अशा प्रकारे गहाळ झालेले व लोकांना ते परत मिळणारच नाही अशी समज झालेली व त्यांनी संपूर्ण आशा सोडलेले 14 मोबाईल किंमत अंदाजे सव्वा ते दीड लाख रुपये किमतीचे पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत काही मोबाईल समक्ष वापरकर्त्याकडून घेतलेले आहेत काही मोबाईल चक्क वापरकर्त्याला गुन्हा दाखल करण्याची तंबी दिल्यानंतर त्यांनी पोस्टाने पाठवून दिलेले आहेत बहुतांश हे मोबाईल व राज्यातील आहेत. आणि सदरचे मोबाईल आज संबंधित व्यक्तींना परत देण्यात आले त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद त्यावेळी दिसून आला. पोलीस नेहमी हे दंड वसूल करताना वाहतुकीवर शिस्त लावताना दिसून येतात त्यामुळे ते साहजिकच त्यांचे विरोधक वाटतात परंतु लोक उपयुक्त हरवलेल्या वस्तू चोरी झालेल्या वस्तू त्यांना परत दिल्यानंतर पोलीस त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचा मित्र वाटू लागतो या योजनेतून पोलीस आणि जनता यांचे संबंध वृद्धीत होण्यास निश्चितपणे हातभार लागत आहे


सदरचे मोबाईल माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस कर्मचारी दशरथ इंगवले सागर जामदार शाहू राणे शंकर काळे महिला पोलीस कर्मचारी माने गोरड यांनी परत केलेले आहेत. सदरचे मोबाईल पोलीस कर्मचाऱ्यांचे हस्ते परत करण्यात आलेले आहेत.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025