मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Friday, 21 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

बारामती ! ग्रामपंचायत वडगाव निंबाळकर थकबाकीदार खातेदारांची नावे फ्लेक्स बोर्डवर खरच जाहीर करणार का ?  

mnewsmarathi प्रतिनिधी
March 28, 2023 1 मिनिटांचे वाचन 5004 वेळा पाहिले

वडगाव निं. प्रतिनिधी – फिरोज भालदार

 बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत ने सर्व घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदार खातेदार यांना फ्लेक्स बोर्ड लावून कळविण्यात आले आहे की ग्रामपंचायत घरपट्टी कराची मागणी केली असताना ही अद्याप ग्रामपंचायतकडे खातेदारांनी भरणा केलेला नाही अशा खातेदारांकडून त्यांच्याकडे असणारी सर्व थकबाकी त्वरित भरण्याचे सांगितले आहे . खातेदारांनी आपली थकबाकी न भरल्यास पंचायत समिती बारामती कडील कर वसुली पथक वसुलीसाठी ग्रामपंचायतकडे येणार आहे . ग्रामपंचायत वडगाव निंबाळकरने प्रत्येक चौकात फ्लेक्स लाऊन व प्रत्येक घरोघरी जाऊन आपली थकबाकीची पावती देऊन खातेदारांना कळवण्यात आले आहे . तरी वडगाव निंबाळकर खातेदार आपली थकबाकी ३१ मार्च आगोदर भरणार का ?

सर्व खातेदारांनी थकबाकी न भरल्यास थकबाकी खातेदारांचे नळ कनेक्शन कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात येणार आहे . असे या फ्लेक्स बोर्डवर ठळक अक्षरात लिहून वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत ने वडगाव निं या ठिकाणी फ्लेक्स लावलेले आहे व यात थकबाकीदार खातेदारांनी जर थकबाकी भरली नाही तर त्यांचे नावे फ्लेक्स बोर्ड द्वारे चौकात प्रसिद्ध करण्यात येतील व खातेदारांनी कर वसुलीसाठी जप्तीसारख्या अप्रिय बाबीचा अवलंब ग्रामपंचायतला करावा लागेल असे या फ्लेक्स द्वारे वडगाव निंबाळकर ग्रामस्थांना कळविण्यात आले आहे .

खातेदारांनी थकबाकी नाही भरल्यास फ्लेक्स वर लिहिले आहे त्यापद्धतीने ग्रामपंचायत वडगाव निं. आपले दिलेल्या शब्दाचे चे पालन करणार का ? अशी चर्चा वडगाव निं. ग्रामस्थांकडून होताना दिसत आहे .

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा