मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
क्राईम

नीरा – मोरगाव रोडवर चाकू व कोयत्याचा धाक दाखवून व्यापाऱ्याला लुटले .

mnewsmarathi 01 Apr 2023 1 मिनिट वाचन 9,166 वाचन

प्रतिनिधी – फिरोज भालदार

दि. ३० /३/२०२३ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास नीरा- मोरगाव रोडने प्रवास करत असताना तीन अज्ञात चोरट्यांनी चाकू व कोयताचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याची घटना घडली आहे.
मोहम्मद अब्दुल रहीम कुरेशी वय २७ हे औरंगाबाद येथून कपडे खरेदीसाठी निघालेल्या व्यापाऱ्याला मोरगाव ता. बारामती येथील शिवशंभु हॉटेल जवळ तीन अज्ञात व्यक्तींनी कोयत्याचा व चाकूचा धाक दाखवत व्यापाराकडील आठ लाख रुपयांची रोकड लुटली याबाबत मोहम्मद अब्दुल रहीम कुरेशी व्यवसाय कापड दुकान रा. रमणासपुरा शहागंज बिनिमिया दर्गा जि.औरंगाबाद यानी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे .

यावरून पोलिसांनी तीन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये फिर्यादी अब्दुल हे लहान मुलांची कपडे घेण्यासाठी फिर्यादी यांचा कापड दुकान भागीदार फजल पटेल यांच्याकडून ४ लाख रुपये व फिर्यादी मोहम्मद अब्दुल याचे ४ लाख रुपये असे मिळून रोक ८ लाख रुपये कॅश घेऊन हे रक्कम बोलेरो पिकप गाडी नंबर एम. एच.२० डी ६०५९ याचे ड्रायव्हर सीट खाली पांढऱ्या रंगाच्या पिशवीत ठेवून फिर्यादी व ड्रायव्हर असे रात्री १०.३० वाजता औरंगाबाद येथून निघाले असता ते प्रवास करत असताना मोरगाव- निरा रोडवर ता. बारामती जि. पुणे गावच्या हद्दीत आले असता त्यांची पिकप जिभला शिवशंभू ढाब्याजवळ तीन अज्ञात व्यक्ति यानी त्यांचे ताब्याची स्विफ्ट डिझायर पांडऱ्या रंगाची गाडी पिवळ्या रंगाची नंबर प्लेट व त्याच्या पाठीमागे काळा बंपर पडलेला असलेला गाडीने फिर्यादीच्या ताब्यातील पिकअप गाडीला आडवी गाडी मारून फिर्यादी यांना कोयता व चाकूचा दाख दाखवून गाडीतील रोख रक्कम ८ लाख ७ हजार रुपये व मोबाईल घेऊन गेले आहेत.
पुढील तपास स.पो.नि. सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई शेलार हे करीत आहेत.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi