मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

प्रगतशील शेतकरी श्री सतीश उद्धव ढुके यांना कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान

mnewsmarathi 02 Apr 2023 1 मिनिट वाचन 9,964 वाचन

प्रतिनिधी

इंदापूर:

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व  पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने देण्यात येणारा ‘कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार अगोती नं. २ (ता. इंदापूर) गावचे सतीश उद्धव ढुके यांना प्रदान करण्यात आला. सदर पुरस्काराचे वितरण पुणे येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

सन्मानपत्र, शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, साडी आणि अकरा हजार रुपये रोख, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

जैविक खतांचा वापर व ऊस या फळबागांचे यशस्वी उत्पादन घेतले.मागील 8 वर्षे पासून  शेतीतील ठिबक सिंचन व पिकांसाठी जीवामृतचा वापर करीत कलिंगड, केळी, पपई, पेरू, डाळिंब या निर्यातक्षम फळबागांचे उत्पादन घेतल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी ग्रामविकास अधिकारी साधू काळे, सरपंच चांगदेव ढुके, ज्योतिर्लिंग सोसायटीचे माजी अध्यक्ष हनुमंत ढुके, संजय ढुके, उत्तम ढुके, गणेश ढुके, सुरेश ढुके आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi