• Home
  • सामाजिक
  • कोविड- १९ व Influenza आजारांकरिता उपाययोजना व घ्यावयाच्या काळजीबाबत
Image

कोविड- १९ व Influenza आजारांकरिता उपाययोजना व घ्यावयाच्या काळजीबाबत

प्रतिनिधी- कोमल काळे

सदयस्थितीत महाराष्ट्र राज्यात वाढत असलेल्या Seasonal Influenza आजार आणि कोविड-१९ आजाराच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्वतयारी व उपाययोजना राबविणेकामी मा. सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्रमांक सचिव- २ / कोविड-१९/३८४/२०२३ दि. ३१/३/२०२३ अन्वये आवश्यक ती कार्यवाही व उपाययोजना करणेबाबत सूचित केलेले आहे.

कॉविड- १९ व Influenza ची लक्षणे ही श्वसन संस्थेशी निगडीत असून त्यामध्ये खोकला, श्वास घेणेस त्रास, निमोनिया, ताप इत्यादी प्राथमिक लक्षणे आहेत. सदर कोविड- १९ विषाणूचा प्रसार हा प्रामुख्याने हवेवाटे त्याचप्रमाणे शिंकणे, खोकणे हस्तांदोलन इत्यादी कारणांमुळे होतो. सदर आजाराचे अनुषंगाने ५० वर्षावरील व्यक्ती, गरोदर माता, लहान बालके, मधुमेह, कॅन्सर व किडनीचे आजार असलेले तसेच ज्या नागरिकांना यापूर्वी कोविड- १९ ची लागण होऊन गेलेली आहे (Post covid) अशा नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सर्व नागरिकांनी वेळोवळी व जेवणापूर्वी नियमितपणे हात साबणाने स्वच्छ धुवावेत, शिंकताना, खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा, हस्तांदोलन टाळावे, चेहरा, नाक व डोळे यांना वारंवार हाताने स्पर्श करू नये आणि विशेष म्हणजे गरज नसतांना गर्दीचे व बंदिस्त ठिकाणी जाणे टाळावे.

शासनाच्या निर्देशानुसार सदर आजाराची व्यापती वाढू नये, यासाठी सातारा जिल्हयात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सातारा जिल्हयातील सर्व प्रकारची शासकीय / निमशासकीय कार्यालये, तसेच बँका, शाळा, महाविदयालये इत्यादी मधील सर्व शासकीय विभागातील अधिकारी / कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर दैनंदिन करणे अनिवार्य आहे.

तसेच गर्दीच्या ठिकाणी व सार्वजनिक ठिकाणी (आठवडे बाजार, एसटी स्टॅण्ड परिसर, यात्रा, मेळावे, लग्नसमारंभ, मोठया प्रमाणात लोक एकत्र येण्याची ठिकाणे) इ. ठिकाणी सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा. तसेच सामाजिक अंतर राखून वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा.

सदर परिपत्रकातील नमूद निर्देशांची तात्काळ काटेकोरपणे अंमलबजावणी करणेची जबाबदारी सातारा जिल्हयातील सर्व संबंधीत विभाग प्रमुखांची राहील यांची गांर्भियाने नोंद घ्यावी.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे पत्रकार दिनाच्या पत्रकारांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा.

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांचा…

ByBymnewsmarathi Jan 6, 2026

बारामती बिबट्या संदर्भातील चुकीच्या बातमीबाबत स्पष्टीकरण व जाहीर माफी.

आमच्या ‘एम न्यूज मराठी’ (M News Marathi) या न्यूज पोर्टलवर काल, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी बारामती परिसरात…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

भीमाशंकर मंदिर ३ महिने बंद ठेवण्याबाबत प्रशासकीय चर्चा; लवकरच होणार अंतिम निर्णय

प्रतिनिधी बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २८८.१७ कोटींचा विकास…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

गोमाता’ फक्त भाषणातच का? रस्त्यावर फेकल्या जाणाऱ्या वासरांच्या नशिबी मरणयातनाच!

सह संपादक- अक्षय थोरात ​ ​आपण गायीला ‘माता’ मानतो, तिची पूजा करतो. पण आज समाजातील एक भयाण वास्तव…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025