• Home
  • सामाजिक
  • आरटीई 25% अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन नोंदणी सुरु, १७ मार्च पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी-विश्वजित मुंडे.
Image

आरटीई 25% अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन नोंदणी सुरु, १७ मार्च पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी-विश्वजित मुंडे.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 RTE अंतर्गत समाजातील दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शाळेमध्ये 25% जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या २५% जागांवर दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी बुधवार दि.01/03/2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झाली असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.17/03/2023 ही आहे. तरी पालकांनी ऑनलाईन अर्ज परळीतील एकमेव प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र असलेले सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र येथे भरावेत असे आवाहन परळीतील एकमेव प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र चे संचालक विश्वजीत मुंडे यांनी केले आहे

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अंतर्गत कायम विनाअनुदानित, विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यीत शाळांमध्ये 25% राखीव जागांसाठी सन 2023-2024 करीता ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हा ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व जन्म प्रमाणपत्र जवळ ठेवणे आवश्यक आहे. सदर प्रवेश प्रक्रियेतून विद्यार्थ्याला शाळा मिळाल्यास पालकांचे वार्षिक उत्पन्न दाखला, पालकाचे आधार कार्ड, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, विद्यार्थ्यांचे जन्म प्रमाणपत्र, पालकाचे जात प्रमाणपत्र, पालकाचे हमीपत्र इत्यादी कागदपत्रे जवळ असणे गरजेचे आहे. तसेच शासनाने शिक्षणापासून मुले वंचित राहू नये गरीब मुलांनादेखील अद्यावत व गुणवत्तापूर्वक इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण घेता यावे यासाठी शासनाने ही योजना सुरु केली आहे. या मोफत प्रवेशा पोटी फीचा परतावा शासन करणार आहे. अशा महत्वपूर्ण व आपल्या पाल्याचे भविष्य घडवण्यासाठी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे.तेव्हा पालकांनी आपला वेळ न दडविता ऑनलाईन अर्ज अचूक मार्गदर्शन मिळवण्यासाठी परळीतील एकमेव प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्रास भेट देऊन आपला अर्ज भरून घेण्यात यावा असे आव्हान विश्वजीत मुंडे (9158363277) यांनी केले आहे.

Releated Posts

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे पत्रकार दिनाच्या पत्रकारांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा.

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांचा…

ByBymnewsmarathi Jan 6, 2026

बारामती बिबट्या संदर्भातील चुकीच्या बातमीबाबत स्पष्टीकरण व जाहीर माफी.

आमच्या ‘एम न्यूज मराठी’ (M News Marathi) या न्यूज पोर्टलवर काल, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी बारामती परिसरात…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

भीमाशंकर मंदिर ३ महिने बंद ठेवण्याबाबत प्रशासकीय चर्चा; लवकरच होणार अंतिम निर्णय

प्रतिनिधी बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २८८.१७ कोटींचा विकास…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

गोमाता’ फक्त भाषणातच का? रस्त्यावर फेकल्या जाणाऱ्या वासरांच्या नशिबी मरणयातनाच!

सह संपादक- अक्षय थोरात ​ ​आपण गायीला ‘माता’ मानतो, तिची पूजा करतो. पण आज समाजातील एक भयाण वास्तव…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025