आमदार निधीतुन पुंरदर तालुक्यातुन सर्व माध्यमिक विद्यालयानां एकुण ६० विद्यालयांना प्रिंटर चे वाटप

माझा जिल्हा

प्रतिनिधी

 

सासवङ दि ३ एप्रिल २०२३ रोजी पुरंदर हवेलीचे आमदार श्री संजयजी जगताप सर यांच्या प्रयत्नातुन व शिक्षक आमदार श्री जंयत आसगांवकर यांच्या आमदार निधीतुन पुंरदर तालुक्यातुन सर्व माध्यमिक विद्यालयानां एकुण ६० विद्यालयांना प्रिंटर चे वाटप करण्यात आले

या कार्यक्रमास शिक्षक आमदार श्री जंयत आसगांवकर यांनी शिक्षण विभागातील अनेक प्रश्न मार्गी लावण्या बाबत सर्वाना अश्वाशित केले नवीन अनुदानावर आलेल्या शाळेची पिळवणुक होणार नाही याचीही काळजी कुणी करु नका सरळमार्गी कांम असेल तर कुणालाही एक रुपया देऊ नका काय अङचन असेल तर मला फोन करा मी सदैव तुमच्या सोबत असलेचे सुचीत केले .

तसेच श्री वंसतराव ताकवले,यांनी वश्री नंदकुमार सागर सर यांनी शिक्षण विभागातील विविध प्रश्नावर हात घातला व प्रश्न मार्गी लावण्याबाबत आमदाराना आग्रह धरला .या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे शिक्षकेत्तर संघटणेचे कार्याध्यक्ष नेते मा श्री शिवाजीराव खांङेकर या सभेस संबोधित करताना म्हणाले राज्यातील सर्व संघटना एकञित येऊन यापुढील काळात लढा देण्याची गरज आहे .संघटणेच्या एकीच्या बळावर झोपलेले राज्य कर्ते जागे होतील आणी सर्व कामे मार्गी लागतील .

या कार्यक्रमास श्री सुधाकर जगदाळे,श्री दताञय गिरमे, श्री मधुकर जगताप ,श्री प्रल्हाद गिरमे, श्री रामदास जगदाळे ,श्री रामप्रभु पेटकर, श्री विनय कोरे ,श्री रामदास शिन्दे ,श्री संजय धुमाळ ,श्री शेङगे ,श्री रामभाऊ भोसले , श्री शिवाजी काकङे देशमुख ,इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुञसंचालन श्री नंदकुमार सागर यांनी केले व आभार श्री दताञय रोकङे यांनी केले