प्रतिनिधी
नागपूर ते पुणे हा प्रवास आठ तासात करणे शक्य होईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
सध्या नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची होणारी गैरसोय बघता नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग हा नव्याने प्रस्तावित असलेल्या पुणे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पुणे-औरंगाबाद या अॅक्सेस कंट्रोल ग्रीन एक्सप्रेस मार्गाला छत्रपती संभाजीनगर जवळ जोडता येईल, असे गडकरी यांनी आपल्या ट्विट संदेशांच्या मालिकेत म्हटले आहे.
हा रस्ता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी संपूर्णपणे नव्याने सहाय्य करून बांधण्यात येईल असेही त्यांनी म्हटले आहे.
यामुळे समृद्धी महामार्गावरुन पुणे ते छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद पर्यंत दोन अडीच तासात आणि नागपूर ते छत्रपती संभाजी नगर म्हणजेच औरंगाबाद हा साडेपाच तासांचा प्रवास प्रत्यक्षात करणे शक्य होईल, असे गडकरी म्हणाले.