मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Monday, 28 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 02 February 2026 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

ट्रॅक्टर चोरी प्रकरणातील आरोपीच्या वडगाव निंबाळकर पोलिसांनी आवडलेल्या मुसक्या 

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
February 2, 2026 1 मिनिट वाचन 8,534 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाघळवाडी गावाचा हद्दीत सोमेश्वर साखर कारखाना केनियार्ड येथून तक्रारदार प्रसाद विजय सोनवणे राहणार न्हावी तालुका भोर जिल्हा पुणे यांचा अर्जुन महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर नंबर MH 12 YN 8446 हा दिनांक 30/01/2026 रोजी रात्री अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर 23/2026 BNS कलम 303(2) अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला.सदर तक्रारीच्या अनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांना तात्काळ रवाना करून घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक व गोपनीय माहिती आधारे संशयित शुभम चंद्रकांत इंगळे राहणार राजुरी तालुका फलटण जिल्हा सातारा यांना गुन्ह्याच्या अनुषंगाने ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना सदर गुन्ह्याचा तपास कामी नमूद आरोपी ला अटक करून मा. न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेण्यात आली. त्यांच्याकडून तपासात चोरलेला अर्जुन महिंद्र कंपनीचा ट्रॅक्टर नंबर MH 12 YN 8446 जप्त करून अशा एकूण 9,00,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार कुंडलिक कडवळे हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. गणेश बिरादार, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा. सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, मा. अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली नागनाथ पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक दीपक वारुळे, पोलीस हवालदार पोपट नाळे, अमोल भोसले, अनिल खेडकर, पोलीस नाईक भाऊसाहेब मारकड, पोलीस अंमलदार आबा जाधव, सूरज धोत्रे, नरेंद्र यादव, धनंजय भोसले, विलास ओमासे यांनी मिळून केली.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख