जुन्नर-आंबेगाव उपविभागात मंचर येथे ११ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

माझा जिल्हा

प्रतिनिधी

 राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशानुसार गुरुवारी ११ मे रोजी जुन्नर-आंबेगाव उपविभागीय अधिकारी यांच्या मंचर येथील कार्यालयात सकाळी ११ वाजता महसूल न्यायालयातील अर्धन्यायिक प्रकरणांसाठी विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या विशेष लोक अदालतीसाठी संबंधित पक्षकारांना नोटीसा पाठविण्यात आल्या असून विशेष लोक अदालतीचे कामकाज व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची एकूण ६ पथके तयार करण्यात आलेली आहेत.

या विशेष लोक अदालतीत सन २०१३ ते २०२० या कालावधीतील प्रलंबित दावे मुख्यत्वे तडजोडीने निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल.

विशेष लोक अदालतीमध्ये पक्षकारांनी व त्यांच्या विधिज्ञांनी हजर राहून जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन *गोविंद शिंदे* उपविभागीय अधिकारी जुन्नर-आंबेगाव, उपविभाग, मंचर (पुणे) यांनी केले आहे.