जुबिलंट इंग्रेव्हिया कंपनीने आपला खत प्रकल्प बंद करावा ग्रामपंचायत निंबुत चे कंपनीस पत्र.

माझा जिल्हा

संपादक मधुकर बनसोडे.

जुबिलंट इंग्रेव्हिया या कंपनीच्या खत प्रकल्पामुळे निंबुत व परिसरातील नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. या खत कंपनीमध्ये उसाच्या रॉ मटेरियल पासून खत निर्मिती केली जाते त्यामुळे या भागामध्ये मच्छर, माशा, अशा विविध प्रकारचे कीटक तयार होत आहेत व या कीटकांमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे अशा आशियाचे पत्र ग्रामपंचायत निंबूत सरपंच निर्मला काळे यांच्यावतीने जुबिलंट इंग्रेव्हिया कंपनीस दिलेले आहे.

 या पत्रावरती कंपनी प्रशासन काय निर्णय घेणार नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता आपला खत प्रकल्प बंद करणार का. की ग्रामपंचायत निंबूत च्या पत्राला दाखवणार केराची टोपली अशा चर्चा सध्या ग्रामस्थांमधून होत आहेत.

 या खत प्रकल्पामुळे निरा बारामती रस्त्याची देखील मोठ्या प्रमाणात दुरावस्था होत आहे त्याचप्रमाणे नागरिकांना श्वास घेण्याकरिता देखील अडचणी येत आहेत नींबूत पासून निरे पर्यंत या कंपनीच्या वासामुळे तोंड दाबून जावं लागत असल्याचे देखील नागरिकांमधून बोलले जात आहे.

 या खत कारखान्यांमध्ये खत चाळण्याकरिता लहान मुलांचा देखील वापर केला जातो? अशी देखील चर्चा परिसरातील नागरिकांमधून होत आहे ग्रामपंचायत प्रशासनाने उपाययोजना करण्यासंदर्भात वेळोवेळी कंपनी प्रशासनास सांगितले आहे मात्र कंपनी प्रशासन कोणत्याही प्रकार त्या ठिकाणी उपाययोजना करत नाही असे देखील या पत्रात म्हटले आहे?

 निंबुत नजीक लक्ष्मी नगर येथे मोठ्या प्रमाणात आज डेंगू, मलेरिया, अशा आजाराने ग्रस्त नागरिक आहेत येथील लोकांचे उपजीविकेचे साधन म्हणजे मच्छीमारी असून त्यावर देखील भविष्यात गदा येते की काय आजही मच्छीमारी करण्यासाठी निरा नदी पात्रात गेल्यास मोठ्या प्रमाणात मृत मासे सापडतात.

 त्यामुळे जीवन जगणेच असाह्य झाले आहे मग दवाखान्याचा खर्च करायचा कोठून असा देखील प्रश्न या नागरिकांसमोर उभा राहिलेला आहे.

 पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे सर्व ग्रामस्थांचे सह्यांचे पत्र देऊन कंपनी गेट वरती ग्रामस्थ उपोषणासाठी बसणार असल्याची देखील चर्चा नागरिकांमधून होत आहे.

 का घेत नाही कंपनी ग्रामपंचायत निंबूत च्या पत्राची दखल का करत नाही कायमस्वरूपीच्या उपाययोजना.

 काही नागरिकांमधून असे देखील बोलले जात आहे लक्ष्मी नगर येथील लोकांना त्रास देऊन येथून उठवायचे व ती जागा बळकवायची असा देखील कंपनीचा मानस असू शकतो?

 गरिबांना कोणी वाली आहे का नाही का फक्त आमच्या मतापुरताच आमचा वापर केला जातो का कंपनी प्रशासनाच्या विरोधात कोणी आमच्याबरोबर उभे राहत नाही आम्ही देखील तुमच्या सारखेच माणसं आहोत अशा बोलक्या प्रतिक्रिया नागरिकांमधून आता उमटत आहेत.

अश्या कितीही बातमी केल्या तरी कंपनीला काहीही फरक पाडणार नाही असे काही अधिकारी खाजगीत बोलत आहेत?

 लवकरच नींबूत कर स्वच्छ श्वास घेतील हीच अपेक्षा.