अखेर जुबीलंट कंपनीकडून लक्ष्मी नगर येथे फॉगिंग सुरू. मात्र ग्रामपंचायत निंबूच्या पत्रावरती अद्याप कोणताही निर्णय नाहीच?

राजकीय

संपादक मधुकर बनसोडे.

जुबिलंट इंग्रेव्हिया या कंपनीच्या खत प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यातच नींबूत नजीक लक्ष्मी नगर येथे मोठ्या प्रमाणात डेंगूचे पेशंट आढळल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने कंपनीकडे फॉगिंग करण्याची मागणी 3/5/23 रोजी पत्राद्वारे केली होती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी इसाक मुजावर यांच्या म्हणण्यानुसार फॉगिंग कंपनीमार्फत पाच तारखेला केले होते

मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून या गोष्टीला दुजोरा देत फॉगिंग हे कंपनीकडून न करता ग्रामपंचायत प्रशासनाने फॉगिंग केल्याचा दावा केला जात आहे? कंपनीकडून स्थानिक नागरिकांच्या आरोग्याची कोणतीही दखल घेतली जात नाही असा देखील दावा ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे त्याच अनुषंगाने ग्रामपंचायत प्रशासन निंबुत यांनी कंपनीचा खत प्रकल्प त्वरित बंद करावा अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आलेली आहे

या पत्रामध्ये आठ दिवसात उत्तर कंपनीने द्यावे अशी देखील मागणी ग्रामपंचायत प्रशासनाने केलेली होती मात्र अद्याप कोणतेही लेखी स्वरूपाचे उत्तर कंपनी प्रशासनाकडून ग्रामपंचायत प्रशासनास दिलेली नाही अशी देखील माहिती मिळालेली आहे खरंच कंपनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या पत्राचा विचार करून येणाऱ्या काही दिवसात खत प्रकल्प बंद करणार का? हे पहाणे  औचित्याचे ठरणार आहे. गरजू व गरीब कुटुंबातील लोकांचा उपचार कंपनी प्रशासनाने करावा असे देखील स्थानिक नागरिकांच्या चर्चेमधून बोलले जात आहे.