ग्रंथालयांना वार्षिक अहवाल व लेखा परीक्षण अहवाल सादर करण्याचे आवाहन

माझा जिल्हा

प्रतिनिधी

 शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या कामकाजावर आधारित वार्षिक अहवाल 30 जूनपर्यंत व लेखा परीक्षण अहवाल 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानप्राप्त सार्वजनिक ग्रंथालयांनी त्यांचे मागील आर्थिक वर्षाचे वार्षिक अहवाल व सनदी लेखापालांनी केलेले लेखा परीक्षण अहवाल जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पुणे येथे सादर करण्याच्या तारखा विहित केलेल्या आहेत. विहित मुदतीत वार्षिक अहवाल व लेखा परीक्षण अहवाल प्राप्त न झाल्यास परीक्षण अनुदान वितरीत करण्यात येणार नाही आणि त्याची सर्व जबाबदारी संबंधित ग्रंथालयाची राहील, असेही जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. दे. संगेपाग यांनी कळविले आहे.