• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर येथे शेतकऱ्यांसाठी विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन
Image

बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर येथे शेतकऱ्यांसाठी विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन

प्रतिनिधी

कृषि विभाग आणि पाणी फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील माऊली शेतकरी गट व भैरवनाथ शेतकरी गटांतील शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर दशपर्णी अर्क निर्मिती, प्रकाश सापळा, माती परीक्षण नमूने व बीज उगवणक्षमता इत्यादी प्रात्यक्षिकांचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले.

यावेळी तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल, मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत मासाळ, कृषी पर्यवेक्षक श्री. काझडे, पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक पृथ्वीराज लाड, माऊली व भैरवनाथ गटातील शेतकरी आदी उपस्थित होते.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. काचोळे यांनी शेतकऱ्यांना शेती, शेतीतील सुधारित पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करून बीज उगवण क्षमता आणि बीजप्रक्रिया बाबत चर्चा केली. कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना बीजप्रक्रियेसाठी लागणारी औषधे व कामगंध सापळे अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. पाणी फाऊंडेशनचे काम स्तुत्य असल्याचे ते म्हणाले.

तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल यांनी उपस्थित शेतकऱ्यांना खरीप हांगमाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांना मानक कार्यप्रणालीची माहिती देऊन काही प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. गटातील सर्व शेतकऱ्यांनी दशपर्णी अर्क बनवण्याची माहिती घेवून २०० लिटर दशपर्णी अर्क बनवला. यानंतर श्री. काचोळे यांनी मौजे पिंपळी येथील प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग अंतर्गत कृष्णा एंटरप्रायजेसच्या लाकडी तेल घाणा युनिटची पाहणी केली.

Releated Posts

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026

बारामती तालुक्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तीन दिवसीय अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

प्रतिनिधी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), बारामती तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय अभ्यासवर्ग दि. २६, २७…

ByBymnewsmarathi Jun 29, 2026

सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जेष्ठ नागरिक व बारा वर्षे पुढील मुली व महिलांसाठी एसटी बसचा पास काढणे शिबिर आयोजन.

प्रतिनिधी  बारामती. निंबुत येथे सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत गावातील बारा वर्षावरील मुली, व महिलांसाठी एसटी…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026