प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह शिरुर या संस्थेत 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक मुलींनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन शिरुर येथील वसतिगृहाच्या गृहपाल श्रीमती आर.व्ही. साखरे यांनी केले आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग शारिरीकदृष्ट्या दिव्यांग व अनाथ या प्रवर्गातील विद्यार्थींना शासन नियमानुसार आरक्षित टक्केवारी प्रमाणे त्या-त्या प्रवर्गात प्रवेश देण्याचे येणार आहे.
शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थींना विनामुल्य भोजन व निवासाची व्यवस्था असून शिक्षण संस्था प्रमुखाच्या शिफारशीनुसार अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरीता आवश्यक असलेली क्रमीक पुस्तके, शैक्षणिक साहित्य, गणवेश व कॉलजचे ड्रेसकोड इत्यादी शासनाने ठरवून दिलेल्या आर्थिक मर्यादेपर्यंतची रक्कम विद्यार्थींनींच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. तसेच दरहा 600 रुपये निर्वाह भत्ता अदा करण्यात येतो. शासकीय वसतिगृहाचे प्रवेश अर्ज विनामुल्य मिळतील. अधिक माहितीसाठी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह शिरुर जि. पुणे येथे संपर्क साधावा.