• Home
  • माझा जिल्हा
  • येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदी व कर्मचाऱ्यांसाठी नेत्र तपासणी शिबीर संपन्न
Image

येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदी व कर्मचाऱ्यांसाठी नेत्र तपासणी शिबीर संपन्न

प्रतिनिधी

येरवडा मध्यवर्ती कारागृह, डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट व एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील बंदी व कर्मचारी यांची मोफत नेत्र, मोतीबिंदू तपासणी व मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

यावेळी अपर पोलीस महासंचालक व कारागृह व सुधारसेवा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, येरवडा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक अनिल खामकर, एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाचे संचालक परवेज बिलिमोरिया, डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टचे अध्यक्ष संकेत शहा उपस्थित होते.

सुधारणा व पुनर्वसन या धोरणा अंतर्गत कारागृहातील बंद्यांकरीता अशासकीय संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या अनुषंगाने नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या नेत्र तपासणी शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून बंदी तसेच कर्मचारी यांची नेत्र तपासणी करण्यात येऊन उपचार करण्यात आले. तसेच चष्मा आवश्यक असलेल्या बंद्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या नेत्र तपासणी शिबिरात एकूण १५९ बंद्यांची तसेच २५ कारागृह कर्मचाऱ्यांनी या नेत्र तपासणी शिबीराचा लाभ घेतला.

Releated Posts

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026

बारामती तालुक्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तीन दिवसीय अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

प्रतिनिधी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), बारामती तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय अभ्यासवर्ग दि. २६, २७…

ByBymnewsmarathi Jun 29, 2026

सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीने जेष्ठ नागरिक व बारा वर्षे पुढील मुली व महिलांसाठी एसटी बसचा पास काढणे शिबिर आयोजन.

प्रतिनिधी  बारामती. निंबुत येथे सतीश भैय्या कल्याणकारी संघ यांच्या वतीने निंबुत गावातील बारा वर्षावरील मुली, व महिलांसाठी एसटी…

ByBymnewsmarathi Jun 19, 2026

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

मोरगाव – प्रतिनिधी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026