भारतीय युवा पँथर संघटनेच्या उपोषणाला यश.

Uncategorized

प्रतिनिधी.

मा.जिल्हाधिकारी पुणे यांच्या कार्यालयासमोर बेमुदत चक्री उपोषण भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे करणार होते.सदर उपोषण सुरू करण्या अगोदरच मा.पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना कारवाईचे आदेश मा. धनंजय जाधव तहसीलदार गृह शाखा जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांनी दिले. त्यामुळे दिनांक 31 ऑक्टोबर 2022 चे चक्री उपोषण स्थगित केले.

सदर उपोषणाचा विषय असा होता की गौरव अहिवळे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून जातीय द्वेषातून नाहक त्रास देणाऱ्या गणेश इंगळे उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती,सुनील महाडिक पोलिस निरीक्षक बारामती शहर पोलिस स्टेशन ,ढाकणे पोलिस उपनिरीक्षक बारामती शहर पोलिस स्टेशन ,नदू जाधव बारामती तालुका पोलिस स्टेशन कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध आधिनियम कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रारी अर्ज दिला होता .

सदर अर्जावर कोणती कारवाई न झाल्यामुळे माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत चक्री उपोषण करणार होते.सदर अर्जाची दखल घेऊन मा.पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना कारवाईचे आदेश मा. धनंजय जाधव तहसीलदार गृह शाखा जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांनी दिल्यानंतर चक्री उपोषण स्थगित केले.पत्रावर कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन येत्या काळात करणार असल्याचे देखील गौरव आहिवळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

पत्र स्विकारताना गौरव अहिवळे संस्थापक अध्यक्ष भारतीय युवा पँथर संघटना,मा.विराज भोसले उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश,मा.शुभम गायकवाड अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र राज्य,विराज औदुते सदस्य भारतीय युवा पँथर संघटना,मा.महेश चव्हाण (अध्यक्ष बौद्ध युवक संघटना कोऱ्हाळे बुद्रुक ). मा.सोमनाथ जाधव संपादक लोकमान्य न्यूज मराठी,मा. योगीराज खोमणे कार्यकारी संपादक लोकमान्य न्यूज मराठी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.